बेंगळुरू, ७ जानेवारी २०२४: क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीची कॉर्पोरेट ट्रॅव्हल क्षेत्राशी सुसंगत राहण्याची योजना आहे आणि त्यांचे नवीन कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट उत्पादन – आऊट ऑफ ऑफिस (ओओओ) चे लाँच या प्रवासाच्या दिशेने सुरूवातीचे पाऊल आहे. हे अद्वितीय कॉर्पोरेट ट्रॅव्हल बुकिंग टूल – ओओओ लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ऑनबोर्ड करण्यात आलेले ३०० एसएमई आणि सक्रियपणे व्यवहार करणाऱ्या जवळपास १० मोठ्या व एंटरप्राइज कंपन्यांसह प्लॅटफॉर्म दरमहिन्याला २० कोटी रूपयांच्या व्यवसाय आकारमानाचा व्यवहार करत आहे.
प्लॅटफॉर्मचे स्थिर आर्किटेक्चर आणि युजर इंटरफेस डिझाइन मोठे उद्योग व एसएमई क्लायण्ट्सच्या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्यासाठी एकसंधी कन्फिग्युरेशन सक्षम करतात. ओओओच्या दृष्टिकोनाचे मुलभूत तत्त्व प्रत्येक व्यवसायाच्या अद्वितीय प्रवास गरजांची पूर्तता करण्याचे आहे.
ओओओ व्यासपीठाच्या सुरूवातीच्या अवलंबनकर्त्यांमध्ये प्रतिष्ठित कंपन्यांचा समावेश आहे, जसे द फेडरल बँक, सिफी टेक्नॉलॉजीज, एमजीएम हेल्थकेअर, स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन लि. आणि एसीसी लिमिटेड. ओओओला त्याच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत वरचढ ठरवणाऱ्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये रिअल-टाइममध्ये धोरणे बदलण्याची किंवा निर्माण करण्याची क्षमता, ट्रॅव्हल ऑफरिंग्जसह एकीकृत प्रवास खर्च, स्वयं-करार केलेले कॉर्पोरेट भाडे उपलब्ध करून देण्याची क्षमता, रिअल-टाइम इन्वॉईस आणि रिकॉन्सिलिएशन इंजिन. आयओएस आणि अँड्रॉईडसाठी नेटिव्ह अॅप लवकरच लाँच करण्यात येणार आहे.
या विकासाबाबत मत व्यक्त करत क्लीअरट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यप्पन आर. म्हणाले, ”जगभरातील व्यवसाय सुरळीत होणाऱ्या स्थितीचा अनुभव घेत असतना आम्हाला कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी मागणीमध्ये अनपेक्षित वाढ दिसण्यात आली. या स्थितीमध्ये ‘आऊट ऑफ ऑफिस’ (ओओओ) महत्त्वपूर्ण सोल्यूशन म्हणून उदयास आले आहे. समकालीन व्यासपीठांच्या तुलनेत हे व्यासपीठ एकाच सर्वसमावेशक पॅकेजमध्ये एण्ड-टू-एण्ड प्रवास अनुभव, युजर-केंद्रित इंटरफेस, धोरण अनुपालन आणि किफायतशीरपणा देते. ओओओ विद्यमान मागणीमधील वाढीची पूर्तता करण्यासह व्यवसायांच्या कॉर्पोरेट ट्रॅव्हलप्रती दृष्टिकोनाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास देखील मदत करते.”
ओओओ हे प्लग-अॅण्ड-प्ले सोल्यूशन आहे, जे त्वरित कंपन्यांच्या गरजांशी जुळून जाते. हे व्यासपीठ विविध बुकिंग पद्धतींचे (सेल्फ-बुकिंग, ट्रॅव्हल डेस्क बुकिंग), तसेच एकाच क्षणात विविध कंपन्यांचे व्यवस्थापन करू शकते. या टूलचा ३० टक्के बुकिंग्जवर आणि ७० टक्के धोरण अनुपालनावर फोकस आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे टूल हॉटेल इन्वॉईसेसच्या खरेदीची सुविधा देत कॉर्पोरेट्ससाठी समस्यांचे निराकरण करते.
ओओओची अनोखी वैशिष्ट्ये
· वन-क्लिक ऑनबोर्डिंग वैशिष्ट्य जलद ऑनबोर्डिंग प्रक्रिया देते, ज्यामुळे व्यवसाय त्वरित व्यवहार सुरू करू शकतात.
· मोठे उद्योग जीएसटी बिलिंग फंक्शनच्या माध्यमातून बचत करू शकतात.
· सविस्तर खर्चासंदर्भातील रिपोर्ट डॅशबोर्ड सुलभ ट्रॅकिंगसाठी प्रवाससंबंधित सर्व खर्चांचे अचूक रिपोर्टिंग देते.
· विविध प्रोव्हायडर ऑप्शन्स वैशिष्ट्य टूलला विविध विक्रेत्यांकडून सर्वात स्वस्त भाडेदर प्रदान करण्यास साह्य करते.
· वन-क्लिक स्विच वापरकर्त्यांना इन्वॉईसिंग प्राधान्यांवर आधारित रिसेलर व एजन्सी मॉडेल्समध्ये बदल करण्याची सुविधा देते.
ओओओसह क्लीअरट्रिपने कॉर्पोरेट ट्रॅव्हल क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. टूलची अतुलनीय अनुकूलता, धोरण-केंद्रित व युजर-अनुकूल इंटरफेस टूलला अद्वितीय तत्त्व बनवते, जे कंपनीला त्यांच्या बी२बी व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करेल.
ओओओबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या: https://ooo.cleartrip.com/


