Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedखराडी - वाघोली, पुणे येथे गोदरेज प्रॉपर्टीजने ~ 14 एकर जमीन संपादित...

खराडी – वाघोली, पुणे येथे गोदरेज प्रॉपर्टीजने ~ 14 एकर जमीन संपादित केली या प्रकल्पातून अंदाजे ~ 4,200 कोटी* रुपये महसूल निर्मितीचा अंदाज

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: गोदरेजप्रॉप) या भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सने खराडी – वाघोली, पुणे येथे ~ 14 एकर जमीन विकसित करण्याची घोषणा करत त्यासाठी जमीनही संपादित केली आहे.

या जागेवर प्रामुख्याने प्रीमियम गटातील घरे उभारली जातील. या प्रकल्पाची विकासक्षम क्षमता ~3.7 दशलक्ष चौरस फूट आणि अंदाजे महसूल क्षमता ~ 4,200 कोटी* रुपये असेल.

पुण्यातील खराडी येथील प्रमुख व्यापारी केंद्रांजवळ ही जागा असल्याने शाळा, रुग्णालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स तसेच मोठी हॉटेल्स, अशा जीवनावश्यक गोष्टी हाकेच्या अंतरावर उपलब्ध होऊ शकतात. तसेच छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही येथून जवळच आहे.

पुण्यातील प्रमुख आयटी आणि बिझनेस हबपासून जवळ असल्याने तसेच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि वाढत्या सामाजिक बदलांमुळे खराडी-वाघोली मायक्रो मार्केट या भागाला सध्या राहण्यासाठी प्रचंड मागणी आहे. काम करणाऱ्यांकडून या भागाला सातत्याने प्राधान्य मिळत असल्याने हा भाग वेगाने विकसित होत असून पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या विस्तारासाठी कारणीभूत ठरतो आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, खराडी – वाघोली हे पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण असून या मायक्रो मार्केटमध्ये प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे पुण्यातील आमचे स्थान भक्कम होते. तसेच भारतातील प्रमुख मायक्रो मार्केट्समध्ये आमची उपस्थिती मजबूत करण्याच्या आमच्या धोरणाशी हे जोडलेले आहे. उत्तम प्रतीची घरे ग्राहकांना देणे, हे आमचे लक्ष्य आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्याचा दीर्घकाळ फायदा होईल.”

*सध्याच्या व्यावसायिक अंदाजाच्या आधारे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments