ठिबक व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली तसेच अन्य कृषी तंत्रज्ञानाच्या उपाययोजनांवर आधारित जल व ऊर्जा व्यवस्थापन प्रणालींद्वारे सकारात्मक प्रभाव निर्माण करणे, हा कंपनीचा उद्देश.
· समाज आणि पर्यावरण यांवर सकारात्मक परिणाम घडविण्याच्या महिंद्रा समूहाच्या वचनबद्धतेचा हा एक भाग.
मुंबई, ५ जून २०२५ – सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड हिने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सुमारे २६२ कोटी लिटर पाणी आणि ८.४ मिलियन युनिट (एमयू) इतक्या ऊर्जेची बचत करण्यात यश मिळवले आहे. जमिनीचे पुनर्भरण व दुष्काळप्रतिबंधक उपाय यांसाठी कटिबद्ध असलेल्या ‘महिंद्रा ईपीसी’ने ही कामगिरी सानुकूलित सूक्ष्म सिंचन प्रणाली, सामुदायिक सिंचन प्रकल्प आणि कृषी जलव्यवस्थापन उपक्रमांच्या माध्यमातून साध्य केली.
‘कमी संसाधनांतून अधिक’ आणि ‘निसर्गाचे पुनरुज्जीवन’ ही तत्त्वे बाळगणाऱ्या ‘महिंद्रा ईपीसी’च्या प्रयत्नांचे हे फलित आहे. ही कामगिरी महिंद्रा समूहाच्या शाश्वततेच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असून, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन व हवामान बदलाच्या संदर्भात ठोस योगदान देण्याच्या उद्देशाने ती प्रेरित आहे.
‘महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक रमेश रामचंद्रन या संदर्भात म्हणाले, “महिंद्रा ईपीसी’मध्ये आम्ही शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सूक्ष्म सिंचनाच्या व्यापक प्रसारासाठी प्रयत्न करीत असतो. हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना आम्ही केवळ पाण्याचीच नव्हे तर ऊर्जेचीही मोठ्या प्रमाणात बचत घडवून आणली आहे. भारतीय शेतीला अधिक टिकाऊ व समर्थ बनवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ‘प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन’ या सरकारच्या धोरणाशी व महिंद्रा समूहाच्या ‘शाश्वततेच्या आराखड्या’शी हे उद्दिष्ट सुसंगत आहे.”
जमिनीची निकृष्टता व दुष्काळ यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्याचा व्यापक दृष्टिकोन ‘महिंद्रा ईपीसी’ने बाळगला आहे. सिंचन तंत्रज्ञानातील नवकल्पना त्याचाच एक भाग आहे. शेतकऱ्यांना प्रभावी जलव्यवस्थापनासाठी आवश्यक साधने व ज्ञान उपलब्ध करून देत ही कंपनी शेती उत्पादनक्षमता वाढविण्याचे आणि पर्यावरणीय साधनसंपत्तीचे जतन करण्याचे काम करीत असते.
वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांसाठी व समुदायांसाठी सानुकूलित जलव्यवस्थापन सोल्यूशन्स ‘महिंद्रा ईपीसी’तर्फे पुरविण्यात येतात. यांमध्ये स्वयंचलन, पर्यायी तंत्रज्ञान व सामाजिक सहभाग यांच्या माध्यमातून आधुनिक वैज्ञानिक उपाय प्रदान केले जातात.
कंपनीकडे भारतभरात १,००० हून अधिक चॅनेल पार्टनर्सचे मजबूत जाळे असून, विविध भागांत शाखाही आहेत. नियोजन, डिझाइन, प्रतिस्थापन आणि कृषिविज्ञान यांसंबंधीच्या सेवा कंपनीतर्फे उच्च दर्जात प्रदान केल्या जातात. या सेवा डिजिटल पद्धतीनेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात.


