Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडियातर्फे एयर मॉरिशससह कोडशेयर भागिदारीचा विस्तार मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेसह...

एयर इंडियातर्फे एयर मॉरिशससह कोडशेयर भागिदारीचा विस्तार मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेसह असलेली कनेक्टिव्हिटी वाढवणार · दक्षिण आफ्रिकेतील १७ मार्गांवर कोडयशेयरचा विस्तार · भारत आणि दक्षिण आफ्रिका, रेयुनियन आणि मादागास्कर येथे मॉरिशसमार्गे जाण्यासाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी

गुरुग्राम, 5 जून २०२५ – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची जागतिक विमानवाहतूक कंपनी आणि मॉरिशसची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी असलेल्या एयर मॉरिशसमध्ये त्यांची कोडशेयर भागिदारी आणखी विस्तारण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना भारतीय उपखंड आणि आफ्रिकेमध्ये जास्त चांगली कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होईल.

दोन्ही विमान कंपन्यांनी नवी दिल्लीत झालेल्या ८१ व्या आयटा एजीएमच्या पार्श्वभूमीवर कोडशेयर कराराचा विस्तार केला आहे. यावेळी एयर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन आणि एयर मॉरिशसचे अध्यक्ष किशोर बीगु उपस्थित होते.

या नव्याने विस्तारण्यात आलेल्या द्विपक्षीय कराराचा एक भाग म्हणून एयर इंडिया आणि एयर मॉरिशसतर्फे भारत, मॉरिशस, रेयुनियन, दक्षिण आफ्रिका आणि मादागास्करदरम्यानच्या १७ मार्गांवर डेझिग्नेटर कोड वापरणार आहे.

सुधारित कोडशेयर भागिदारीसह एयर इंडिया दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन आणि जोहान्सबर्ग येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्या एयर मॉरिशस फ्लाइट्वर आपला ‘AI’ डेझिग्नेटर कोड वापरणार आहे. यामुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना सहजपणे मॉरिशसद्वारे या शहरांपर्यंत एकाच तिकिटावर आणि अंतिम ठिकाणापर्यंतच्या बॅगेज चेकसह प्रवास करता येणार आहे. एयर इंडियाने यापूर्वीच मॉरिशस आणि मुंबई, दिल्ली व रेयुनियनदरम्यानच्या फ्लाइटसाठी कोडशेयर सुरू केलेला आहे.

एयर मॉरिशसतर्फे सध्या आपला ‘MK’ डेझिग्नेटर कोड एयर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद, कोलकाता, गोवा, दिल्ली आणि बेंगळुरू, चेन्नई विमानसेवेसाठी वापरला जात आहे.

अशाप्रकारे एयर इंडिया आणि एयर मॉरिशसदरम्यानच्या सर्व विमानसेवांवर डेझिग्नेटर कोड असेल आणि पर्यायाने दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांसाठी विमानसेवेचे विविध पर्याय उपलब्ध होतील.

एयर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिका आणि मॉरिशससाठी भारत ही सर्वात मोठ्या पर्यटन बाजारपेठांपैकी एक आहे तसेच या भागातील बळकट व्यापारी भागीदारही आहे. एयर मॉरिशससह असलेली भागिदारी विस्तारण्याने जागतिक नेटवर्क वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले असून त्यामुळे आमच्या ग्राहकांना सहजपणे या ठिकाणी प्रवास करता येईल.’

‘एयर मॉरिशसला एयर इंडियासह भागिदारी विस्तारताना आनंद होत असून त्यामुळे आमच्या प्रवाशांना भारतातील असंख्य ठिकाणी मुंबई, दिल्ली आणि चेन्नईद्वारे बऱ्याच ठिकाणी प्रवास करता येणार आहे. भारतातून मॉरिशसला जाणाऱ्या प्रवाशांना बहुसांस्कृतिकतेबरोबरच वैविध्यपूर्ण स्थानिक पदार्थांचाही आस्वाद घेता येईल, शिवाय रेयुनियन, दक्षिण आफ्रिका, मादागास्कर अशा ठिकाणी एयर मॉरिशसह सुलभपणे प्रवास करता येईल,’ असे एयर मॉरिशसचे अध्यक्ष किशोर बीगु म्हणाले.

अतिरिक्त कोडशेयर विमानसेवा १ जुलै २०२५ पासून एयर इंडिया आणि एयर मॉरिशसची बुकिंग चॅनेल्स व ट्रॅव्हल एजंटद्वारे बुकिंगसाठी खुली होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments