Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedजल ही अमृत’ यशस्वी उपक्रमात पिंपरी चिंचवडचा झळाळता नावलौकिक..!

जल ही अमृत’ यशस्वी उपक्रमात पिंपरी चिंचवडचा झळाळता नावलौकिक..!

१९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना स्टार मानांकन; शासनाकडून एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर

पिंपरी, ६ जून २०२५ : ‘जल ही अमृत’ उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी (एसटीपी) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महापालिकेच्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावती आहे. महानगरपालिकेने आता पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ‘एकात्मिक सांडपाणी कृती आराखडा तयार केला आहे. शहरातील व्यापक प्रमाणात सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो, या दृष्ठीने नियोजन सुरू आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने चर्चासत्रे, मार्गदर्शन, गुणगौरव, माझी वसुंधरा शपथ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या “जल ही अमृत” उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी करत ५, ४ व ३ स्टार मानांकन मिळवलेल्या जलशुद्धीकरण केंद्र प्रमुखांचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

आजच्या सत्कारार्थींमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये कार्यरत १७ केंद्र प्रमुख (प्लांट इन्चार्ज), ९ रसायनतज्ञ (केमिस्ट) आणि ५ जलशुद्धीकरण केंद्र चालक यांचा समावेश आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी मंचक जाधव , मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, सोहन निकम, अनिल भालसाखरे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य केमिस्ट उमा भोगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, बालेवाडी येथील निकमार युनिवर्सिटीचे प्रा. डॉ. श्रीधर कुंभार, महाराष्ट्र पर्यावरण मंडळाचे फिल्ड ऑफिसर सीमा सावळे, सुर्यकांत शिंदे व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकूण ३७६ एमएलडी क्षमतेची १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे १९८७ पासून ते २०२५ पर्यंत विविध कालखंडात कार्यान्वित झाली आहेत. केंद्र शासनाच्या मानांकनासाठी ऑक्टोबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये दोन टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये युनिट ऑपरेशन, देखभाल यंत्रणा, डिस्चार्ज मानके, स्वच्छता, कर्मचारी व्यवस्थापन, बायोसोलिड्स पुनर्वापर, पर्यायी ऊर्जा वापर व नाविन्यपूर्ण उपाय अशा विविध निकषांचा समावेश होता.

यावेळी बोलतांना आयुक्त सिंह म्हणाले, ५ स्टार रेटिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव आहे. स्टार रेटिंगमध्येवरच्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १९ मैलाशुद्धीकरण केंद्रांना मानांकन प्राप्त झाले आहे. ही अभिमानस्पद बाब आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे यश साजरा करतांना आनंद होत आहे. यापुढेही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी अशीच कामगिरी करून सातत्य राखावे असे देखील ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहरात असा सन्मान सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ४ प्रक्रिया केंद्रांना ५ स्टार नामांकन मिळाले आहे. हे मानांकन समाधान कारक आहे तथापि आपले पुढील ध्येय हे सर्व STP केंद्रांना ५ स्टार मानांकन मिळवून देणे हे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मत व्यक्त केले.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, आपण सामाजिक बांधिलकीतून पर्यावरणाचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, ही जाणीव ठेवून काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. ‘जल ही अमृत’ उपक्रमाने शाश्वत जलव्यवस्थापनाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या उपक्रमात सहभागी सर्व यंत्रचालक, रसायनतज्ञ, ठेकेदार व कर्मचारी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन, माझी वसुंधरा शपथेचे वाचन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

चौकट- शहरातील १९ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्रास एकूण ३८ कोटी ५० लाखांचे बक्षीस-

अ. क्र.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नाव

स्टार नामांकन

प्राप्त रक्कम

१.

चिखली फेज १

२ कोटी रुपये

२.

चिखली फेज २

४ कोटी रुपये

३.

चऱ्होली फेज १

२ कोटी रुपये

४.

चऱ्होली फेज २

२ कोटी रुपये

५.

कुदळवाडी

२५ लाख रुपये

६.

आकुर्डी

२ कोटी रुपये

७.

चिंचवड फेज २

४ कोटी रुपये

८.

चिंचवड फेज १, भाटनगर

२ कोटी रुपये

९.

रावेत

२ कोटी रुपये

१०.

सांगवी सांडपाणी प्रक्रिया केंद्र

४ कोटी रुपये

११.

दापोडी

२ कोटी रुपये

१२.

कासारवाडी फेज १

२ कोटी रुपये

१३.

कासारवाडी फेज २

२ कोटी रुपये

१४.

कासारवाडी फेज ३

४ कोटी रुपये

१५.

भोसरी २१७

७५ लाख रुपये

१६.

पिंपळे निलख

२ कोटी रुपये

१७.

भोसरी गार्डन

७५ लाख रुपये

१८.

केशवनगर

२५ लाख रुपये

१९.

वाल्हेकरवाडी

५० लाख रुपये

एकूण

३८ कोटी ५० लाख

चौकट – पंचतारांकित (५ स्टार) आणि चार तारांकित (४ स्टार) नामांकन मिळविलेली सांडपाणी प्रक्रिया केंद्रे –

अ. क्र.

केंद्र चालक

केंद्रांचे नाव

नामांकन

मे. श्रीविनय इंजिनियरिंग सर्व्हिसेस प्रा. लि.

कासारवाडी फेज ३

५ स्टार

मे. एक्सेल इलेक्ट्रिकल्स

चिंचवड SBR (फेज २)

५ स्टार

मे. एक्सेल इलेक्ट्रिकल्स

चिखली SBR (फेज २)

५ स्टार

मे. एच. एन.बी. इंजिनिअर्स प्रा. लि.

सांगवी

५ स्टार

मे. जे. डी. खानदेशी

चऱ्होली एसटीपी

४ स्टार

मे. डब्ल्युटीई

वाल्हेकरवाडी एसटीपी

४ स्टार

चौकट – सन्मान करण्यात आलेल्या केंद्र प्रमुखांची नावे-

अ. क्र.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नाव

केंद्र प्रमुखाचे नाव

कासारवाडी टप्पा १,२,३

संजय बालगोडा कुरळे

भाटनगर

संजय परशुराम जाधव

पिंपळे निलख

अक्षय आनंदा घाटगे

सांगवी

शिवाजी किसनराव मुळे

आकुर्डी

पंडित शिवराज बिडवे

चिंचवड

अर्जुन सुखदेव गोखले

चिंचवड

शुभम रणजित साखरे

चिखली फेज १

बसवराज करबसप्पा कांबळे

चिखली फेज २

अक्षय महेश भेंडे

१०

रावेत

अजित अनिल पाटील

११

दापोडी

सुभाष पोमू नाईक

१२

चऱ्होली

राहूल उत्तमराव सावते

१३

कुदळवाडी

मयूर सुरेश भुजबळ

१४

भोसरी २१७

रोहित राजेंद्र भुजबळ

१५

भोसरी ५ एमएलडी

अंकुश दिगंबर नवले

१६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments