Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआकर्षक किंमत आणि सुबक डिझाईन्ससह ‘पीएनजी ज्वेलर्स’ सादर करीत आहेत नवा हिरेजडित...

आकर्षक किंमत आणि सुबक डिझाईन्ससह ‘पीएनजी ज्वेलर्स’ सादर करीत आहेत नवा हिरेजडित हार

मुंबई, ६ जून २०२५ : महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ यांनी त्यांच्या नवीन डायमंड ज्वेलरी मोहिमेअंतर्गत एक अत्याधुनिक आणि सौंदर्यपूर्ण नैसर्गिक हिरेजडित हार सादर केला आहे. या हाराची किंमत फक्त रुपये २,२५,०००/- असून त्यामध्ये आधुनिकतेची झलक आणि कलात्मक कारागिरीचा उत्तम मिलाप असून कुशल कारागिरांच्या कारागिरीतून हा हार साकार झाला आहेत.

पिवळ्या आणि गुलाबी सोन्यात उपलब्ध असलेला हा हार फुलांच्या प्रेरणेतून तयार झालेला असून त्यात पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक डिझाइन यांचे सुंदर मिश्रण आढळते. कमी सोन्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या डिझाइनमुळे हाराचे वजन हलके असून त्यात वापरलेले हिरे अधिक उठून दिसतात, जे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आणि स्टायलिश पर्याय ठरतात.

नैसर्गिक हिऱ्यांची मूळची चमक यात जपली गेली असून त्याला सुसंगत खास अशी या दागिन्यांची रचना करण्यात आली आहे, जी प्रत्येक प्रसंगासाठी तसेच कार्यालयीन वापरासाठी, प्रियजनांना भेट देण्यासाठी उपयोगी ठरेल. तसेच आपल्या वैयक्तिक दागिन्यांच्या संग्रहातही यामुळे अनोखी भर पडेल.

ग्राहकांच्या मागणीनुसार ‘पीएनजी ज्वेलर्स’ने परवडणाऱ्या किंमतीत हिरेजडित दागिन्यांची ही नवी श्रेणी पुन्हा सादर केली आहे, याद्वारे स्टाईल आणि दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना निवड करणे सोयीचे होईल.

ही खास ऑफर २ जून ते ३० जून २०२५ दरम्यान ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

अटी लागू.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.pngjewellers.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments