पुणे, ०९ फेब्रुवारी २०२४: भारतामध्ये व्यापार प्रदर्शनांचे आयोजन करणारी अग्रगण्य संस्था इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाने व्हायटाफूड इंडिया या भारताच्या वेगाने पुढे जात असलेल्या न्यूट्रास्युटिकल उद्योगक्षेत्रातील उत्पादनांच्या प्रदर्शनास संपूर्णपणे समर्पित असलेल्या एकमात्र एक्स्पोच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. युरोपियन आणि आशियाई बाजारपेठांतील आपल्या कामगिरीबद्दल नावाजल्या गेलेल्या, जगभरात ओळखल्या जाणाऱ्या व्हायटाफूड ब्रॅण्डचा अविभाज्य भाग असलेला व्हायटाफूड इंडिया २०२४ हा उपक्रम वेलनेस उद्योगक्षेत्रामध्ये नवे मापदंड निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे भरविले जात असलेले हे प्रदर्शन न्यूट्रास्युटिकल क्षेत्राच्या पुरवठा साखळीतील घटकांना एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी सिद्ध आहे.
व्हायटाफूड्स इंडियाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करताना इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री. योगेश मुद्रास म्हणाले, “जीवनशैलीशी निगडित आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातील जावनशैलींमध्ये स्वास्थ्याच्या दिशेने परिवर्तनकारी बदल होत असताना, व्हायटाफूड्स इंडिया २०२४ या बदलाच्या कहाणीला आकार देणारा एक प्रवर्तक उपक्रम म्हणून उदयास येत आहे. पॅनडेमिकच्या काळात भारतीय न्यूट्रास्युटिकल उद्योगक्षेत्रामध्ये २५% ची जोमदार आर्थिक वाढ दिसून आली असताना, व्हायटाफूड्स इंडिया या क्षेत्राच्या अग्रस्थानी राहून नवसंकल्पनांसाठी आणि सहयोगासाठी एक गतीशील मंच पुरवित आहे. अधिक निरोगी भविष्यासाठी प्रेरक बल म्हणून कार्यरत असलेले व्हायटाफूड्स इंडिया स्वास्थ्यापासून प्रेरणा घेणाऱ्या आपल्या समाजाच्या नवनव्या मागण्यांशी सहजतेने जुळवून घेते.”
व्हायटाफूड्स इंडियाचे महत्त्व अधोरेखित करताना भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग खात्याअंतर्गत येणाऱ्या शेफेक्सिल (SHEFEXIL) एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर डॉ. देबजानी रॉय म्हणाल्या, “भारताला जागतिक न्यूट्रास्युटिकल निर्यातीमध्ये अग्रस्थानापर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी धडपडत असलेल्या शेफेक्सिल चे स्वप्न आपल्या देशाला न्यूट्रास्युटिकल्स आणि संबंधित उत्पादनांच्या क्षेत्रातील पहिल्या पाच निर्यातदारांच्या यादीत नेऊन ठेवण्याचे आहे. आरोग्याविषयी जागरुक असलेल्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने पुरविण्यावर लक्ष केंद्रित करणारे व्हायटाफूड्स इंडिया कंपन्यांना आपली अनुभवकुशलता जागतिक पातळीवर प्रदर्शित करण्याची संधी देणारा एक प्रमुख मंच म्हणून आपली भूमिका निभावत आहे.”
व्हायटाफूड्स इंडिया २०२४ एक महत्त्वाचा स्पर्धक घटक आहे, ज्याची आखणी न्यूट्रास्युटिकल बाजारपेठेसाठी मोठ्या धोरणीपणे करण्यात आली आहे व त्याला या उद्योगक्षेत्राच्या, विशेषत: कोव्हिड-१९ नंतर झालेल्या वाढीचा लाभ मिळाला आहे. रु. ३३,०००० कोटी इतके विद्यमान मूल्य असलेली भारताची न्यूट्रास्युटिकल बाजारपेठ जागतिक स्तरावर अग्रस्थान प्राप्त करण्याच्या तयारीत आहे व २०२५ सालापर्यंत तिची उलाढाल जवळ-जवळ १.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
उद्योगक्षेत्रातील महत्त्वाच्या प्रवाहांना चर्चेमध्ये आणण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची आगळीवेगळी मांडणी करण्यात आली आहे, ज्याचा संपूर्ण भर वैयक्तिकृत आणि ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार तयार केल्या गेलेल्या न्यूट्रास्युटिकल उपाययोजनांना असलेल्या वाढत्या मागणीवर असणार आहे. ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांना प्रतिसाद देत व्हायटाफूड्स इंडिया २०२४ मध्ये शाश्वत न्यूट्रास्युटिकल उत्पादनांच्या वाढत्या लोकप्रियतेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. घटक आणि कच्चा माल, अंतिम उत्पादने, कंत्राटी उत्पादन आणि खासगी लेबल व सेवा व साधनसामग्री अशा या उद्योगातील चार महत्त्वाच्या क्षेत्रांना सामावून घेणारा एकमेव उपक्रम अशी त्याची ओळख बनली आहे.
उपक्रमाच्या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये ५००० हून अधिक पाहुणे, २५ हून अधिक तज्ज्ञ वक्ते आणि १२ शैक्षणिक सत्रांचा समावेश असणार आहे. न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातील नेतृत्वस्थानावरील मंडळी, इन्फ्लुएन्सर्स आणि निर्णयकर्ते यांच्याशी अर्थपूर्णरित्या जोडले जाण्याची अनोखी संधी या प्रदर्शनाद्वारे पुरविली जात आहे.
उद्योगक्षेत्राकडून सहयोगाचे पाठबळ
अत्यावश्यक अशा सहयोगांतून पुढे जाण्याचे बळ मिळवित व्हायटाफूड्स इंडिया २०२४ ने शेलॅक अँड फॉरेस्ट एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल (SHEFEXIL), असोसिएशन ऑफ हर्बल अँड न्यूट्रास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया (AHNMI), हेल्थ फूड्स अँड डायेटरी सप्लिमेंट्स असोसिएशन (HADSA), विमेन इन न्यूट्रास्युटिकल्स (WIN), आणि प्लान्ट बेस्ड फूड्स इंडस्ट्री असोसिएशन (PBFIA) यांसह अनेक विख्यात न्यूट्रास्युटिकल असोसिएशन्सबरोबर सहयोग साधला आहे.


