Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिलीप वेंगसरकर यांचे पुण्यात व्याख्यान*

दिलीप वेंगसरकर यांचे पुण्यात व्याख्यान*

*

पुणे, ता. ७:
पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे येत्या सोमवारी ( ता. ९) व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान नवी पेठेतील पत्रकार भवन येते सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी वेंगसरकर यांचे ‘भारतीय क्रिकेटचे भविष्य : नवी पिढी, नवा वारसा’ विषयावर व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्व क्रिकेटप्रेमी, पत्रकार व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष सुनीत भावे व सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments