Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन कार्यक्रम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व कासारवाडी येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या उपक्रम संकल्पनेनुसार राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले होते,त्याअनुषंगाने पिंपरी येथील मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आलेला होता.
कार्यक्रमास पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे,एम टेक इंजीनियरिंग कंपनीचे संचालक मनीष कोल्हटकर, स्टार्टजिक बिझनेस डेव्हलपमेंट एलिकॉन कास्ट अलॉय लिमिटेड कंपनीचे हर्षवर्धन गुने हे प्रमुख पाहुणे म्हणून तर,इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे,एम टेक इंजीनियरिंग कंपनीचे संचालक मंदार किरणे तसेच ऐश्वर्या कोल्हटकर हे वक्ते आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,तदनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरचित्रवाणीद्वारे राज्यातील विविध ठिकाणच्या या कार्यक्रमांचे उदघाटन केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. शासन, राज्यकारभारापासून ते जलसंधारण,पर्यावरणापर्यंत अनेक बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य हे आजही प्रेरणादायी आणि सर्वांनी शिकण्यासारखे आहे. पाच विषयांची निवड करून त्याविषयांवरती नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणारा हा शासनाचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला अनुसरून आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री यांच्या उपक्रम संकल्पनेनुसार आजच्या दिवशी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, जागतिक कर्तव्य व जबाबदारी, स्वदेशी विचार संकल्पना आणि सामाजिक समरसता अशा विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आलेबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी दूरचित्रवाणी संदेशातून दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापक दूरदृष्टीचा विचार व त्यांची नेतृत्वशैली याबाबत माहितीही त्यांनी दिली.
“सामाजिक समरसता व कुटुंब प्रबोधन”या विषयावर मनीष कोल्हटकर यांनी मार्गदर्शन करताना स्वत:चा व्यवसाय व उद्योग असणा-या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याबाबत मार्गदर्शन केले.
तर हर्षवर्धन गुने यांनी युवा पिढीस एरोस्पेस, रेल्वे व डिफेन्स इत्यादी क्षेत्रांमधील असलेल्या तांत्रिक क्षेत्रातील मागणीबाबत माहिती दिली. संदीप बेलसरे यांनी सदर कार्यक्रम स्तुत्य व महत्त्वाच्या असून औद्योगिक क्षेत्रांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना असलेल्या मागणीबाबत व तांत्रिक कौशल्याबाबत माहिती दिली.
सागर शिंदे यांनी “सामाजिक समरसता” याविषयी इंजिनिअरिंग कस्टरची भूमिका व शासनाचे धोरण यांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि यशस्वी उद्योजक झालेल्या उद्योजक रहिमान बागवान, अरमान शेख, तुषार शिंदे, सिध्दार्थ तूपलोंढे, शीतल लांडगे, संदिप भागवत,अश्विनी गलांडे, श्वेता मोरे, प्रगती दनाणे, रोहिणी म्हस्के, सागर मोरे, अभिषेक तायडे,सुरज बारटक्के या माजी विद्यार्थी उद्योजकांच्या व्यावसायिक दालनांना (बिजनेस स्टॉलला) भेट देऊन त्यांचे उपक्रम, उत्पादन,विक्री व सेवा व्यवस्थापन याबाबत माहिती जाणून घेतली.
प्राचार्य शशिकांत पाटील यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत आणि विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य तसेच त्यांच्या मागणीबाबत सविस्तर माहिती दिली.
गटनिदेशक किसन खरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन मंगेश कलापुरे व निलेश लांडगे यांनी केले तर प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कार्यालय अधिक्षक उमा दरवेश तसेच शर्मिला काराबळे,राजकुमार तिकोने,विजय भैलुमे,प्रवीण शेलार,रविंद्र ओव्हाळ, विशाल रेंगडे,विक्रम काळोखे, पुनम गलांडे,उल्हास कुंभार,सचिन तापकीर,बाळासाहेब थोरात, अमित सोळंकी सर्व निदेशक व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments