Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedअभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या पुण्यातील चौथ्या शोरूमचे उद्घाटन

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या पुण्यातील चौथ्या शोरूमचे उद्घाटन

जागतिक दर्जाच्या वातावरणात खरेदीचा आलिशान अनुभव

पुणे, 9 जून २०२५ – कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या दागिने कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने आज पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील कोहिनूर वर्ल्ड टॉवरमध्ये नवी शोरूम लाँच केली. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या दागिन्यांची विविध कलेक्शन्स खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा, जागतिक दर्जाचे वातावरण यांसह खरेदीचा असामान्य अनुभव दिला जाणार आहे.

उद्घाटनावेळेस उपस्थित प्रेक्षकांना अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, ‘आज कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्ससारख्या विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहककेंद्रीत दृष्टीकोन अशी मूल्ये जपणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्व करणं माझ्यासाठी सन्माननीय आहे. मला विश्वास आहे, की आमचे ग्राहक कल्याण ज्वेलर्सचे मनापासून स्वागत करतील आणि इथली अनोखी सेवा तसेच दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीचा आनंद घेतील.’

कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन नव्या शोरूमविषयी म्हणाले, ‘पुण्यात कल्याण ज्वेलर्सची नवी शोरूम लाँच करतन आम्ही इथल्या ग्राहकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे व त्यांचा खरेदीचा अनुभव उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे. आम्ही नाविन्यपूर्ण सेवा, ग्राहकांना जागतिक दर्जाच्या वातावरणात देण्यासाठी आणि विश्वास व पारदर्शकता या कंपनीच्या तत्वांशी एकनिष्ठ राहाण्यासाठी बांधील आहोत. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही कायम दर्जा व सेवेवर लक्ष केंद्रित करत अनोख्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यावर भर देतो. ’

हे लाँच साजरे करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने प्रत्येक १० ग्रॅमच्या सोने खरेदीवर ०.५ ग्रॅम सोने मोफत दिले जाणार आहे. कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट – बाजारपेठेत सर्वात कमी आणि कंपनीच्या सर्व शोरूम्समध्ये समान असून तो ही दागिने खरेदीवर लागू होणार आहे. या ऑफर्स मर्यादित काळासाठी सुरू असतील.

कल्याण ज्वेलर्समधील सर्व रिटेल दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्क असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. कल्याण ज्वेलर्सतर्फे त्यांचे खास ४ लेव्हल अश्युरन्स सर्टिफिकेट ग्राहकांना दिले जाते. त्याच्या मदतीने जगभरातील ग्राहकांना प्युरिटी सर्टिफिकेशन, आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची तपशीलवार माहिती, पारदर्शक एक्सचेंज आणि बाय- बॅक पॉलिसीजसारखे लाभ घेता येतात. हे सर्टिफिकेशन निष्ठावान ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याची ब्रँडची बांधिलकी दर्शवणारे आहे.

या शोरूममध्ये कल्याणचे काही लोकप्रिय हाउस ब्रँड्सही पाहायला मिळणार आहेत. त्यात मुहुरत (लग्नासाठीचे दागिने), मुद्रा (हँडक्राफ्टेड अँटिक दागिने), निमाह (टेंपल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सोलेटेयर हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट हिरे), अपूर्वा (खास प्रसंगांसाठीचे हिरे), अंतरा (लग्नासाठी हिरे), हेरा (दैनंदिन वापरासाठीचे हिरे), रंग (प्रेशियस स्टोनचे दागिने) आणि नुकतेच लाँच करण्यात आलेले लिला (कलर्ड स्टोन्स आणि हिऱ्यांचे दागिने) यांचा समावेश असेल.

ब्रँड, कलेक्शन आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या https://www.kalyanjewellers.net/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments