Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसांघिक टेबल टेनिस स्पर्धा पीवायसी जिमखाना 'क' संघास खुल्या गटाचे विजेतेपद डेक्कन...

सांघिक टेबल टेनिस स्पर्धा पीवायसी जिमखाना ‘क’ संघास खुल्या गटाचे विजेतेपद डेक्कन जिमखाना अ संघास उपविजेतेपद

पुणे दिनांक ९ जून २०२५
पीवायसी जिमखाना ‘क’ संघास शिवम कार्टोन पुरस्कृत सांघिक टेबल टेनिस स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद पटकाविले. डेक्कन जिमखाना अ संघास उपविजेतेपद मिळाले

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबने पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित केली होती. अटीतटीने झालेल्या अंतिम सामन्यात पीवायसी जिमखाना ‘क’ संघाने डेक्कन जिमखाना ३-२ असे पराभूत केले. विशेष म्हणजे या लढतीमधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर पीवायसी जिमखाना संघाने उर्वरित तीनही सामने जिंकून विजयश्री खेचून आणली.

एकेरीच्या पहिल्या सामन्यात पीवायसी संघाच्या भार्गव चक्रदेव याला रजत कदम याच्याकडून ४-११,११-७,८-११, ११-८, १०-१२ असा पराभव पत्करावा लागला पाठोपाठ त्याचा सहकारी प्रणव घोलकर याला डेक्कन जिमखाना संघाच्या वैभव दहिभाते याच्याविरुद्ध ११-९,११-९,७-११, ९-११,८-११ अशी हार पत्करावी लागली. त्यावेळी डेक्कन जिमखाना संघाकडे २-० अशी आघाडी होती. मात्र दुहेरीत भार्गव चक्रदेव व जय पेंडसे यांनी वैभव दहिभाते व अक्षय देशपांडे यांचा ११-६,७-११,११-६, ११-७ असा पराभव केला आणि पीवायसीचे आव्हान राखले. पाठोपाठ प्रणव घोलकर याने परतीच्या सामन्यात रजत कदम याचा ११-४,८-११,१२-१०, ४-११, १२-१० असा पराभव करून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. एकेरीच्या निर्णायक सामन्यात जय पेंडसे याने अक्षय देशपांडे याचा ११-९,१२-१०, ११-३ असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला आणि संघाच्या विजेतेपदावर शिक्कामार्फत केले.

उपांत्य फेरीत पीवायसी ‘क’ संघाने टॉस अकादमी ‘अ’ संघाचा ३-१ असा पराभव केला तर डेक्कन जिमखाना संघाने एम्स अकादमी संघाला ३-१ असे पराभूत केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments