Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहर तालुका स्तरीय लोकशाही दिन आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे १६...

पुणे शहर तालुका स्तरीय लोकशाही दिन आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे १६ जून रोजी आयोजन

पुणे, दि. १० : पुणे शहर तहसील स्तरीय लोकशाही दिनाचे १६ जून रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत महात्मा गांधी विद्यालय, घोरपडी पेठ पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली आहे. लोकशाही दिनाबरोबरच एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्यावतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री यांनी सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे या करिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कारणास्तव नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात यावा असे या परिपत्रकाद्वारे आदेशित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील नागरीकांनी त्यांच्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सदर दिवशी दाखल करावेत, असे आवाहनही श्री. येवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments