Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील पहिल्या रग्बी प्रिमियर लीगसाठी कॅपजेमिनीची ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून घोषणा

भारतातील पहिल्या रग्बी प्रिमियर लीगसाठी कॅपजेमिनीची ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून घोषणा

मुंबई,11 जून 2025 : कॅपजेमिनीने आज आयआरएफयू बरोबर आपल्या सहयोगाचा विस्तार करत पहिल्या लीग आधारित व मालकीच्या रग्बी फ्रँचायझीसाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर बनले आहे.जीएमआर रग्बी प्रिमियर लीग (आरपीएल) हे रग्बी 7एस स्वरूपात खेळले जाईल.अधिकृत ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून कॅपजेमिनी खेळाडूंची कामगिरी वाढविण्यास,खेळाडूंचे सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील प्रोफाईल्स उंचावण्यास आणि रग्बीमध्ये तळागाळातील सहभाग वाढविण्यास मदत करेल.

भारतात रग्बीमध्ये सहभाग आणि जागरूकता यामध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि जीएमआर आरपीएल सह एक धाडसी पाऊल उचलले गेले असून भारतातील 5 सर्वोत्तम खेळांमध्ये स्थान मिळविले आहे.कॅपजेमिनीचा रग्बीबरोबरचा सहयोग जागतिक स्तरावर 30 वर्षापासून अधिक आहे आणि जीएमआर आरपीएलचा हा नवीन सहयोग रग्बी 7एस वुमेन ॲन्ड गर्ल्स आणि रग्बी 7एस मेन ॲन्ड बॉईज संघांसाठी सहयोगी प्रायोजक म्हणून कंपनीच्या मागील भारतातील सहभागाचा हा विस्तार आहे.भारतातील रग्बीमधील आपला ठसा आणखी मजबूत करत कॅपजेमिनीने रग्बी 15एस आणि 7एस या दोन्ही फॉरमॅटसना पाठिंबा देण्यासाठी आयआरएफयू सोबतच्या तीन वर्षांच्या भागीदारीचे नूतनीकरण केले आहे.

कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विन यार्दी म्हणाले की,कॅपजेमिनीचा रग्बीबरोबरचा सहयोग आमच्या संघभावना,धाडसी विचारसरणी,नेतृत्व आणि खऱ्या आनंदाची भावना या प्रेरक तत्त्वांमध्ये खोलवर रूजलेला आहे. खेळ हा आमच्या जागतिक सहभागाचा एक आधारस्तंभ आहे आणि आरपीएलसाठी आयआयएफयू आणि जीएमआर स्पोर्टस सोबत भागीदारीमुळे मैदानावर आणि मैदानाबाहेर सहभागासाठी आमची वचनबध्दता आणखी दृढ झाली आहे.भारतातील रग्बीला अधिक समावेशक आणि सुलभ बनविण्याचे आमचे ध्येय आहे.ज्यामुळे तळागाळापासून व्यावसायिक पातळीपर्यंत खेळाडूंच्या विकासाला पाठिंबा मिळेल.

आयआरएफयूचे अध्यक्ष राहुल बोस म्हणाले की, भारतीय रग्बीसाठी हे ऐतिहासिक पाऊल आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी जुळवून घेणाऱ्या भागीदारासोबत साकारताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.कॅपजेमिनीची समावेशकता,अभिनवता आणि कामगिरीसाठी असलेली वचनबध्दता आम्हाला खेळाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुल्यांना अधिक बळकटी देत या खेळातील सहभाग वाढवत शाश्वत विकास करण्यास सक्षम करेल.जीएमआर आरपीएलसह त्यांची कुशलता आणि मुल्यांवर आधारित दृष्टीकोन या खेळासाठी,आधुनिक,समावेशक आणि स्पर्धात्मक भविष्य घडविण्यास मदत करेल.

जीएमआर स्पोर्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम त्रिवेदी म्हणाले की,भारतात रग्बीचा दर्जा वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये जीएमआर आरपीएल हा महत्त्वाचा टप्पा आहे.कॅपजेमिनी सामील झाल्यामुळे या खेळाचे भारतातील स्थान,त्याच्याकडे कसे पाहिले जाईल आणि या खेळाचा कसा अनुभव घेता येईल याची पुर्नकल्पना करण्यात मोठी झेप घेण्यात आली आहे.हा सहयोग खेळाच्या वाढीसाठी,कामगिरी वाढविण्यासाठी आणि चाहत्यांना आणखी जवळ आणण्यासाठी परंपरा आणि नाविन्यपूर्णतेच्या परिपूर्ण मिश्रणाचे प्रतीक आहे.

आपले दिवंगत संस्थापक, रग्बी उत्साही व खेळाडू यांच्या प्रेरणेने,रग्बी ग्रुपच्या इतिहासात एक विशेष स्थान राखते. कॅपजेमिनीने वर्ल्ड रग्बी आणि त्याच्या काही प्रमुख पुरूष आंतरराष्ट्रीय स्पर्धा (रग्बी वर्ल्ड कप 2007 आणि 2023) आणि महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा (रग्बी वर्ल्ड कप 2021) तसेच एचएसबीसी वर्ल्ड रग्बी सेव्हन्स सीरिजचे प्रायोजकत्व केले आहे.कॅपजेमिनी ही महिला रग्बी वर्ल्ड कप 2025 ची प्रमुख भागीदार देखील आहे.

वुमन इन रग्बी उपक्रमातील जागतिक भागीदार म्हणून खेळामध्ये समावेशकता वाढविण्यात आणि महिलांना नेतृत्वाच्या माध्यमातून सक्षम बनवणे आणि जागतिक स्तरावर महिलांच्या खेळाचा विस्तार करण्याचा उद्देश असलेल्या रग्बी लीडरशीप प्रोग्राममध्ये महिलांना पाठिंबा देण्यासाठी हा गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

जीएमआर आरपीएलच्या पहिल्या सीझनचे जून 2025 मध्ये भारतात आयोजन करण्यात आले आहे. देशातील जीएमआर आरपीएल अशा प्रकारच्या पहिल्या स्पर्धेत भारतातील कौशल्यवान खेळाडूंसह प्रत्येक प्रमुख सात देशांमधील जगातील काही सर्वोत्तम रग्बी स्टार सहभागी होतील. जीएमआर आरपीएल चे भारतातील जीओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्टसवर थेट प्रक्षेपण केले जाईल आणि रग्बीपास टीव्हीवर देखील ऑनलाईन पाहता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments