Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedरायगड रॉयल्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघाचं पारडं जड

रायगड रॉयल्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघाचं पारडं जड

पुणे ११ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेत उद्या (दि. १२ जून) रोजी होणाऱ्या सामन्यात रायगड रॉयल्स संघासमोर स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ईगल नाशिक टायटन्सचे आव्हान असेल.

नाशिकच्या संघाने आत्तापर्यंत स्पर्धेत परिपूर्ण खेळ करत चारही सामने जिंकले असून ८ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. तर तीन सामन्यात दोन दारुण पराभवांमुळे नेट रन रेटच्या आधारावर दोन गुणांसह रायगड तळाला आहेत.

गेल्या दोन सामन्यात रायगड रॉयल्सला दारुण पराभवांना सामोरे जावे लागले होते. त्यांना रत्नागिरी जेट्स (६७ धावांनी) व ४एस पुणेरी बाप्पा (९९ धावांनी) संघानी सहजगत्या मात दिली होती. रायगडच्या संघात सिद्धेश वीर, दिग्विजय पाटील, विकी ओस्तवाल, व हितेश वाळुंज सारख्या गुणवान खेळाडूंचा भरणा आहे पण ऋषभ राठोड व त्याच्या सहकाऱ्यांना विजय मिळवण्यासाठी एकंदरीतच खेळ उंचावावा लागेल.

नाशिकच्या संघात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीच्या जोडीला मनोज इंगळे, अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी असे वेगवान गोलंदाज आहेत. तर कर्णधार व लेगस्पिनर प्रशांत सोळंकी व अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षय वाईकर ह्या दोघांनी फिरकी गोलंदाजीची मदार समर्थपणे सांभाळली आहे.

फलंदाजीतदेखील सर्व खेळाडूंनी उपयुक्त कामगिरी केली आहे. मंदार भंडारीने सलामीच्या सामन्यात शतक झळकावले होते तर अर्शिन कुलकर्णीने त्यानंतरच्या सामन्यात चमक दाखवली होती. पुण्याविरुद्ध संघ अडचणीत असताना रोहन दामले वर रणजित निकम ह्यांनी संघाला तारले होते. त्यामुळे ह्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाचे पारडे नक्कीच जड असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments