· कल्पकरू लिमिटेडच्या (कंपनी) 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी 387 ते 414 रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
· पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव वाटपाच्या भागात अर्ज करणाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 38 रुपये इतकी सवलत दिली जाणार आहे.
· बोली / ऑफर सुरू होण्याची तारीख – मंगळवार, 24 जून 2025, बोली / ऑफर बंद होण्याची तारीख – गुरुवार, 26 जून 2025.
· अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख – सोमवार, 23 जून 2025 (बोली सुरू होण्याच्या एक दिवस आधी).
· गुंतवणूकदारांना किमान 36 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 36 शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
· रेड हेरिंग प्रॉस्पेक्टससाठीची (आरएचपी) लिंक : https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Kalpataru%20Limited%20-%20Red%20Herring%20Prospectus.pdf
· संपूर्ण तपशीलासाठी, कृपया 19 जून 2025 रोजी ‘फायनान्शियल एक्सप्रेस’, ‘जनसत्ता’ आणि ‘नवशक्ति’ या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आलेली किंमत पट्टा जाहिरात देखील पाहा. लिंक : https://epaper.financialexpress.com/4022961/Mumbai/June-19-2025#page/20/1
https://epaper.jansatta.com/4023060/%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%8A/19#page/24
मुंबई, 19 जून 2025 : महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अग्रगण्य रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या कल्पतरू लिमिटेडकडून (कंपनी) मंगळवार, 24 जून 2025 रोजी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली करण्यात येणार आहे.
या आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांची बोली लावण्याची तारीख ही बोली / इश्यू सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरची, म्हणजे सोमवार, 23 जून 2025 ही ठरविण्यात आली आहे. बोली / इश्यू बंद होण्याची तारीख गुरुवार, 26 जून 2025 आहे.
या इश्यूसाठी प्रति इक्विटी शेअर 387 ते 414 रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान 36 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 36 शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
या इश्यूमध्ये 15,900 दशलक्ष (1590 कोटी) रुपयांपर्यंतच्या नवीन इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा (फ्रेश इश्शू) समावेश आहे.
या इश्यूमधून प्राप्त होणाऱ्या निव्वळ रकमेचा उपयोग कंपनी व तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही कर्जांची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड किंवा पूर्वपरतफेड करण्यासाठी, तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट गरजांसाठी करण्यात येणार आहे.
सन 1957 मधील सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियमावलीतील नियम 19(2)(ब), तसेच सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम 31 व नियम 6(2) यांच्या अनुषंगाने हा इश्यू बुकबिल्डिंग पद्धतीने सादर केला जात आहे. या अंतर्गत, नेट इश्यूपैकी किमान 75 टक्के हिस्सा हा प्रमाणानुसार पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असेल. या भागाला “क्यूआयबी हिस्सा” म्हटले जाईल. यापैकी, 60 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्यानुसार अँकर गुंतवणूकदारांना स्वविवेकाधीन पद्धतीने वाटपासाठी कंपनी राखीव ठेवू शकते. या भागाला “अँकर गुंतवणूकदार हिस्सा” म्हटले जाईल. या अँकर गुंतवणूकदारांसाठीच्या हिश्श्यापैकी एकतृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडसाठी राखीव असेल. त्यांनी सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीपेक्षा जास्त किंवा समान दराने वैध बोली लावणे अपेक्षित आहे. जर अँकर हिस्सा कमी भरला गेला अथवा न भरला गेल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स हे क्यूआयबी भागात (अँकर भाग वगळता) समाविष्ट केले जातील. (“नेट क्यूआयबी हिस्सा”).
याशिवाय, नेट क्यूआयबी हिश्श्यापैकी 5 टक्के हिस्सा हा फक्त म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, तर उर्वरित हिस्सा सर्व क्यूआयबी गुंतवणूकदारांसाठी (म्युच्युअल फंडांसह) प्रमाणानुसार उपलब्ध असेल, अर्थात त्यांच्याकडून वैध बोली प्राप्त झाल्यास! नेट इश्यूपैकी जास्तीत जास्त 15 टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. यापैकी, (अ) एकतृतीयांश हिस्सा हा २ लाख ते १० लाख रुपये गुंतवू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी, (ब) उर्वरित दोनतृतीयांश हिस्सा १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी राखीव असेल. या दोन्ही उप-श्रेणींपैकी कोणत्याही भागात जर हिस्सा अपूरा भरला गेला, तर तो उर्वरित उप-श्रेणीतील पात्र बिगर संस्थात्मक अर्जदारांना दिला जाऊ शकतो. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांनी जर इश्यू किमतीपेक्षा जास्त किंवा समान दराने वैध बोली लावली असेल., तर नेट इश्यूपैकी जास्तीत जास्त 10 टक्के हिस्सा त्यांच्यासाठी राखीव असेल. तसेच, वैध बोली प्राप्त झाल्यास, 159.00 दशलक्षपर्यंतच्या एकूण रकमेचे इक्विटी शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवले जातील.
अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व अर्जदारांना एएसबीए (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) प्रक्रियेचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यांनी आपल्या एएसबीए खात्याची माहिती पुरविणे आवश्यक आहे. यूपीआय गुंतवणूकदारांनी आपला यूपीआय आयडी पुरविणे गरजेचे आहे. अर्ज रकमेइतकी रक्कम एससीएसबी किंवा यूपीआय प्रणालीमार्फत ब्लॉक केली जाईल.
या इश्यूअंतर्गत रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्ट होणार आहेत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अॅण्ड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहेत.
या प्रेस नोटमध्ये वापरलेले पण स्पष्ट केलेले नसलेले सर्व भांडवली शब्द 18 जून 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमधील अर्थानुसार घेतले जातील.


