Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएन.ई.एम.एस शाळेत आज योग दिन व जागतिक संगीत दिन अत्यंत उत्साहात...

एन.ई.एम.एस शाळेत आज योग दिन व जागतिक संगीत दिन अत्यंत उत्साहात साजरा

 

 

पुणे: शनिवार पेठेतील,डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एम.एस शाळेत आ दिनांक २१ जून रोजी सकाळ व दुपार सत्रात योग दिन व जागतिक संगीत दिन अत्यंत उत्साहात साजर करण्यात आला.

योगदिनासाठी प्रमुख पाहुणे कसबा विभागाचे आमदार श्री. हेमंत रासने, योगाचार्य डॉ. विदुला शेंडे, सहसचिव योग संस्था पुणे मधील विक्रांत राजवाडे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री. प्रीतम जोशी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

योग आणि स्वछता या दोन्ही गोष्टी आपल्याला विकासाकडे नेणाऱ्या आहेत असं मत श्री हेमंत रासने यांनी मांडलं. तसेच कुठंलही क्षेत्र निवडलं तरी मेहतीने त्यातील उच्च स्थान मिळवलं पाहिजे असा सल्ला सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विदुला शेंडे यांनी कपालभाती, अनुलोम -विलोम, भस्त्रिका, भ्रामरी यासारखे प्राणायाम प्रकार विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. काही योगासने स्वतः आमदार हेमंत रासने, शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांसोबत केली.

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून इयत्ता ७ वी च्या सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थांनी आहार आणि व्यायामाचे महत्त्व सांगणारे

‘हसरी शतवर्षे जयगान’ हे गीत सगळ्यांसमोर सादर केले. संगीत शिक्षिका अश्विनी पटवर्धन यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक प्रमोद उकिर्डे आणि देविदास वाकळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments