Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनयूबीसीचे संस्थापक चौधरी ब्रह्मप्रकाश यांची 107 वी जयंती, देशभर प्रतिसाद,*  ...

एनयूबीसीचे संस्थापक चौधरी ब्रह्मप्रकाश यांची 107 वी जयंती, देशभर प्रतिसाद,*                           *”युवकांनो आपल्या शेतीमाती च्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, रवी राणा प्रेमजीतसिंह.,

 

 

 

*[ पुणे महाराष्ट्र;-* *महाराष्ट्र राज्याचे वेस्टर्न भारत व देशातील तरुणांनी यापुढे नेते आणि पक्षांपेक्षा “आपला बाप आणि शेती आपला समाज आपले हक्काचे आरक्षण,, हे अधिक महत्त्वाचे आहे, म्याहणून यापुढे देशभरातील विद्यार्थी विद्यार्थिनी युवकांनी आपल्या शेती माती, आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक मोठा आदर्श निर्माण करावा असे आवाहन शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार यांनी केशवनगर पुणे महाराष्ट्र राज्य येथे “चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त,, राज्यातील युवकांना उद्देशून केले आहे.,,*

 

*पुणे वृत्तसंस्था.*

*राष्ट्रीय पीछडावर्ग अर्थात एनयूबीसी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चौधरी ब्रह्मप्रकाश यांची 107 जयंती पुणे वेस्टर्न भारत महाराष्ट्र राज्य येथल वेस्टर्न भारत व प्रदेश कार्यालय केशवनगर पुणे महाराष्ट्र राज्य येथे साजरी करण्यात आली, यावेळी शेतकरी व एनयूबीसी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, हडपसर शाखेचे अध्यक्ष महेश गिरी, सदानंद शिंदे सरकार, हिरामण बांदल यांच्या उपस्थितीमध्ये 107 वी जयंती साजरी करण्यात आली.

*यावेळी बोलताना संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष राणा प्रेमजीतसिंह म्हणाले की महाराष्ट्र राज्यासह देशभरात शेतकरी कष्टकरी कामगार सह पीछडावर्ग ओबीसी मराठा आदीवाशी समाआजचजाची आर्थिक समस्या ही अत्यंत जटिल प्रश्न बनलेला असल्याने केंद्र सरकारने त्यावर लवकर निर्णय घ्यावा, चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी दिल्लीचे प्रथम मुख्यमंत्रीपद तर देशाचे कृषिमंत्री पद देखील भूषवले आहे त्यांचा जन्म 16जून 1918 रोजी झाला आहे, चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी देशामध्ये एनयूबीसी या संघटनेची स्थापना, त्यांचे नावाने दिल्ली स्थित मोठे आयुर्वेदिक विद्यालय व हॉस्पिटल, ऑटोमेशन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल हे भारत सरकारच्या अधिपत्याखाली दिल्ली येथे स्थापन केले आहे, दिल्ली राज्याचा देशातील गोरगरीब शेतकरी ओबीसी पीछडावर्ग आदिवासी यांच्यासाठी 11 नोव्हेंबर 1982 ला एनयूबीसी संघटनेची स्थापना केली, आणि आज एनयूबीसी संघटना 45 व्या वर्षात पदार्पण करत आहे, हे माझ्यासारखे तरुण शेतकरी संघटना व एनयूबीसी या चळवळीकडे स्वतःहून सहभागी होत आहेत, आजची परिस्थिती ही सरकार किंवा नेत्यांपेक्षा “आपला बाप आणि आपली शेती, पिछडावर्ग आदिवासी शेतकरी शेती ही अत्यंत महत्त्वाची असल्याने, यापुढे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन युवक अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीत सिंह पवार यांनी केले.,, तर महाराष्ट्र राज्यासह, वेस्टर्न भरतात भारतातील युवक शेतकरी कष्टकरी पीछडावर्ग आदिवासी, युवक विद्यार्थी तरुण तरुणी यांनी शेतकरी व एनयूबीसी संघटनेत स्वतःहून सहभागी होऊन राष्ट्रीय शेतकरी व पीछडावर्ग ओबीसी आदिवासी समाजाला आर्थिक व आरक्षणाचा हक्क न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान रवी उर्फ राणा प्रेमजितसिंह राजे पवार यांनी केले आहे.*

स्वर्गीय चौधरी ब्रह्मप्रकाश यांची 107 वी जयंती महाराष्ट्र वेस्टर्न भारत राजस्थान जयपुर गुजरात हरियाणा पंजाब दिल्ली, चेन्नई कर्नाटक जम्मू काश्मीर आदी राज्यांसह देशभरामध्ये उत्साहात साजरी केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments