Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य, आणि देशाचे आख्खे मंत्रिमंडळ शेतकरी वर्गातले.!* *तरीही भारतीय शेतकरी आत्महत्या...

राज्य, आणि देशाचे आख्खे मंत्रिमंडळ शेतकरी वर्गातले.!* *तरीही भारतीय शेतकरी आत्महत्या का करतो आहे, संघटनेचा आरोप.?*

 

 

*शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ संघटना, एनयूबीसी महासंघ संघटनांचे वतीने राजस्थानचे राज्यपाल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून नंतर निवेदन देण्यात आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना संघटनेने वरील आरोप केला आहे.*

 

 

*जयपूर वृत्तसंस्था.*

*”भारत देशासह राज्यस्थान, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार पीछडा वर्ग अर्थीक संकटात आहेत, त्यात भारतीय शेतकऱ्यांच्या शेतमालाची इंडीयन व्यापाऱ्याकडून होत असलेली लूट जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रण व एनयूबीसी वेस्टर्न भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी जयपुर राजस्थान येथे बोलताना व्यक्त केला, राजस्थानचे महामहीम राज्यपाल यांना शेतकऱ्यांचे वतीने शेतकरी संघटना व एनयूबीसी महासंघ संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी विठ्ठल राजे पवार जयपूर येथे पत्रकारांशी बोलत होते., ते म्हणाले की महाराष्ट्र, राज्यस्थान राज्यासह देशाचे अर्धे मंत्रिमंडळ शेतकरी वर्गातले आहे असे ते म्हणतात.? तरीदेखील भारतीय शेतकरी अर्थीक संकटात कसा,? असा आरोप संघटनेने केला आहे.*

*इंडिया सरकारमधील कृषी मंत्री हे शेतकरी आहेत असे ते म्हणतात, महाराष्ट्र राजस्थान राज्याचे एक/एक मुख्यमंत्री, दोन/२ उपमुख्यमंत्री, तसेच देशाचे कृषिमंत्री महाराष्ट्राचे कृषिमंत्री महाराष्ट्राचे सहकार मंत्री महाराष्ट्राचे दुग्धविकास पासून संवर्धन मंत्री हे सर्व शेतकरी आहेत असे ते खुद्द बोलत आहेत.! मग भारतीय शेतकरी आत्महत्या कसा करतोय.? इंडिया सरकारमधील ये लोक केवळ नोटंकी करत आहेत देशातल्या चुकीच्या अर्थव्यवस्था व मंत्रिमंडळामुळे देशातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे असा सनसनाटी आरोप करत राज्य आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांचे नावे व चोऱ्या करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मंत्रिमंडळ सहभागी असल्याचा खरपूस आरोप विठ्ठल राजे पवार यांनी जयपूर येथे पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की राज्य आणि देशाचे मंत्रिमंडळ हे शेतकऱ्यांचं नसून हे व्यापाऱी अदानी अडाणी धार्जीने आहे आणि इंडियन सरकारने व्यापाऱ्यांची सलग्नी केल्यामुळे, भारतीय शेतकरी अर्थीक संकटात आलेला आहे.*

*गेल्या १४ वर्षापासून भारत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची लूट हे इंडिया सरकारने केलेले महापाप आहे इंडियन सरकार मधले शेतकऱ्यांची आणि शेतमालाची लुट करणारे ते शेतकरी मंत्री नसून मंत्रिमंडळातले दरोडेखोर आहेत, आज इंडिया सरकार केवळ चार लोक चालवत आहेत त्याचे दोन व्यापारी आणि दोन मंत्री आहेत, असा आदरणीय अंबानी यांचे नाव न घेता सनसनाटी आरोप केलेला आहे. ते बोलताना पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री कृषी मंत्री सहकार मंत्री पशुसंवर्धन मंत्री लागले तर गृहमंत्री देखील सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहेत असते म्हणतात.? तरी देखील महाराष्ट्र राज्यातला शेतकरी अर्थीक संकटात आत्महत्या का करतो आहे.? याच्या पाठीमाग च्या विचाराचे संशोधन हे राज्यातल्या युवा शेतकरी कष्टकरी पीछडा वर्ग ओबीसीं, कामगारांनी ओळखलं पाहिजे आणि अशा सरकार मधल्या लूट करणाऱ्या दरोडेखोर प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आता डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या संविधानात च्या सोबतच एकजूट करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.*

*भारत देशामध्ये आर्थिक संकटात सापडलेला पिछडावर्ग शेतकरी ओबीसी यांना आर्थिक आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्या मुलांना शिक्षण आणि कुटुंबियांना गेल्या 40-45 वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी हे इंडिया सरकारचे महा पाप आहे ते सर्व सरकारने शेतकरी कर्जमुक्त करून., त्यापुढे शेती उत्पादन होणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी एम एस पी अर्थात बेस रेट सर्व पिकांना मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली, श्री विठ्ठल राजे पवार व संघटनेचे पदाधिकारी हे जयपूर राजस्थान येथे राजस्थानचे माननीय महामहीम राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली व निवेदन देण्यासाठी आले होते त्यावेळी ते जयपूर येथे उपस्थित पत्रकारांशी बोलत होते, त्यांच्यासमावेत राजस्थान प्रदेश संघटनेचे अध्यक्ष राजपाल मीना, राजस्थानचे प्रवक्ते सुखलाल टाटू (मीना ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत नायकुडे, राजस्थान जयपूर येथील शेतकरी एनयूबीसी चे मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments