Pune 22 June 2025
पुणे ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनेकॉलॉजिकल सोसायटी ( POGS ) व अॅमोग्स ( AMOGS ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहदिंडी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. पुण्यातील अनेक नामवंत डॉक्टर सदस्य या दिंडीत सहभागी झाले. वारीमध्ये सहभागी वारकरी बांधव, सामान्य नागरिकांनी या उपक्रमाची नोंद घेतली.
या दिंडीद्वारे समाजात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला —
” *डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे विश्वासावर आधारित असून, ते अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे* .”
या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाद्वारे डॉक्टरांच्या भूमिकेचा सकारात्मक संदेश देण्यात आला. संवाद, सहकार्य आणि सुसंवाद यांची जाणीव सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या दिंडीत डॉ. मीनाक्षी देशपांडे (POGS माजी सचिव), डॉ. संध्या मेश्राम, डॉ. मंगला वाणी, डॉ. मिलिंद दुगड, डॉ. राधा संगमनेरकर, डॉ. अरुणा ओझा हे देखील सहभागी झाले.
डॉ. अनुराधा जाधव यांनी सर्व सहभागींसाठी अत्यंत सुंदर व स्वादिष्ट नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. निलेश बलकवडे आणि डॉ. आरती निमकर यांनी प्रमुख भूमिका बजावली.
—
सप्रेम,
डॉ. मनीष माचवे – अध्यक्ष, POGS
डॉ. निलेश बलकवडे – सरचिटणीस, POGS
डॉ. किरण कुर्टकोटी – अध्यक्ष, AMOGS
डॉ. बिपिन पंडित – सरचिटणीस, AMOGS
डॉ. रेवती राणे – अध्यक्ष, जनजागृती समिती, AMOGS
डॉ. आरती निमकर – माजी अध्यक्ष, POGS
डॉ. वैशाली बिनिवाले –
- अध्यक्ष, जनजागृती समिती, POGS


