Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप

आयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप

 

 

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) पुणे चॅप्टरने आपल्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त (६० वर्षपूर्ती) सीएमए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्ञानदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबवला. आषाढी वारीच्या पवित्र पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

 

हडपसर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, कार्यकारिणी सदस्य, चॅप्टरचे सदस्य, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

 

सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली म्हणाले, संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच हीरक महोत्सवी वर्षा निमित्त असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे, आयसीएमएआय पुणे चॅप्टर ने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.वर्षभरात असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments