Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपत्रकारिता हे माझे पहिले प्रेम            ...

पत्रकारिता हे माझे पहिले प्रेम             _ देवेंद्र भुजबळ 

 

 

 

चाळीस वर्षांपूर्वी चार वर्षे पत्रकारिता केली.पुढे विविध कारणांनी आधी भारत सरकारची आणि नंतर महाराष्ट्र सरकारची नोकरी केली .तरी पत्रकारिता हेच आपले पहिले प्रेम आहे. त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाने सन्माननीय सहसदस्यत्व बहाल केल्याचा विशेष आनंद होत आहे,असे भावपूर्ण मनोगत श्री देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार,इंडिया टुडे वृत्त वाहिनीचे सल्लागार संपादक श्री राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते संघाचे विविध पुरस्कार प्रदान करण्याचा आणि सन्माननीय सदस्यत्व, सहसदस्यत्व बहाल करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी शाल,श्रीफळ आणि आकर्षक असे सन्मानचिन्ह स्वीकारल्यानंतर

श्री देवेंद्र भुजबळ बोलत होते.

 

आपण मुंबई मराठी पत्रकार संघाचे गेली २५ वर्षे सहसदस्य होतोच पण आता या संघाने

सन्माननीय सहसदस्यत्व बहाल करून आपला बहुमान केला याबद्दल त्यांनी संघाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे आभार मानले.

 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री राजदीप सरदेसाई यांनी आजच्या कार्यक्रमाने आपण खूप भावूक झालो असे सांगून महाराष्ट्रातील गौरवशाली पत्रकारिता ही देशाला नेहमीच

मार्गदर्शक ठरली आहे,असे

गौरवोद्गार काढले.आजच्या पत्रकारितेच्या बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त करून त्यांनी बीड येथील जिल्हास्तरीय पत्रकारांनी ज्या निर्भयपणे काम केले,त्याचे कौतुक करून

अशा पत्रकारांमुळे आपण पत्रकारितेविषयी आशावादी आहोत,असे सांगितले.

 

यावेळी पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार सर्वश्री प्रकाश कुलकर्णी आणि विद्यानंद दाते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

 

पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांनी संघाची वाटचाल विषद करून आगामी उपक्रमांची माहिती दिली.

 

पत्रकार संघाचे कार्यवाह

श्री शैलेंद्र शिर्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले.तर श्री राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले.

 

यावेळी पुढीलप्रमाणे पुरस्कार

प्रदान करण्यात आले:

 

१)शोध पत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : श्री. सूरज सावंत/

श्री. काशिनाथ म्हादे (विभागून).

 

२)वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार :

श्री. शिवराम मांजरेकर.

 

३) सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार :

श्री. प्रकाश कुलकर्णी

 

४) वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ॲड.अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार : श्री. प्रदीप धिवार

 

५)ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : श्री. विद्याधर दाते

 

रोख रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप असून निवड समिती सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, योगेश बिडवई, अभिजित मुळे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments