वॉलमार्टचा नावीन्यपूर्णता, वाढ आणि भागीदारीच्या प्रदर्शनासह भारतात २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा उत्सव
प्रमुख वैशिष्ट्ये:
• वॉलमार्टने भारतातील आपल्या प्रवासावर आणि निर्यात सक्षमीकरण, व्यवसाय कौशल्ये आणि ग्राहक तसेच पुरवठा साखळ्यांसाठी तंत्रज्ञान-नेतृत्वाखालील वॉलमार्ट, फ्लिपकार्ट ग्रुप आणि फोनपेमार्फत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला हातभार लावणाऱ्या उपक्रमांच्या चालू परिस्थितीवर चिंतन करण्यासाठी नवी दिल्ली येथे एक कार्यक्रम आयोजित केला.
• भारतातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे वॉलमार्ट ग्राहक, भागीदार आणि समुदायांसाठी समावेशक वाढ आणि सर्जनशील मूल्य देत आहे. त्यात एमएसएमई सक्षम करणे, निर्यातीला गती देणे, डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवांचा अंगीकार वाढवणे व ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञानातील स्थानिक नवनवीन उपक्रमांना समर्थन देणे समाविष्ट आहे.
नवी दिल्ली, २४ जून २०२५— वॉलमार्टने आज नवी दिल्लीत एका आकर्षक प्रदर्शन कार्यक्रमाद्वारे भारताप्रति असलेली आपली वचनबद्धता साजरी केली. “द इंडिया शोकेस: सेलिब्रेटिंग पार्टनरशिप्स, प्रोग्रेस अँड पॉसिबिलिटीज” या शीर्षकाच्या या कार्यक्रमात वॉलमार्टच्या जागतिक आणि भारतातील व्यावसायिक संघ, सरकारी मान्यवर, मीडिया आणि भागीदारांचे एक सक्रिय नेटवर्क एकत्र आले आणि कंपनीचा देशातील अनेक दशकांचा प्रवास साजरा केला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वॉलमार्ट, फ्लिपकार्ट ग्रुप आणि फोनपेच्या भारतातील सामूहिक उपस्थितीतील कार्यक्रम आणि उपक्रमांमधील उद्योजक, एमएसएमई आणि भागीदारांकडून आयोजित प्रदर्शन होते.
“भारत वॉलमार्टसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे वॉलमार्ट आयएनसीचे अध्यक्ष आणि सीईओ डग मॅकमिलन म्हणाले. “मागील दोन दशकांमध्ये आम्ही लोकांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक व्यवसायांना वाढण्यास मदत करण्यासाठी आमची भागीदारी मजबूत आणि विस्तारित केली आहे. आमचे संघ येथे आणि जगभरातील रिटेल अनुभवांमध्ये परिवर्तन घडवणारे ग्राहक उपाय विकसित करत आहेत. भारतातही सामायिक मूल्य निर्माण करण्यासाठी वॉलमार्ट वचनबद्ध आहे आणि अधिक समावेशक आणि लवचिक भविष्य घडवण्यासाठी भागीदारांसोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
वॉलमार्ट इंटरनॅशनलच्या अध्यक्षा आणि सीईओ कॅथ मॅकले यांनी स्थानिक नवसंशोधन आणि भागीदारीच्या बदलत्या परिस्थितीबाबत चर्चा केली. त्या म्हणाल्या, “आम्ही जगातील सर्वात रोमांचक आणि बदलत्या बाजारपेठांपैकी एकात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करत आहोत. फ्लिपकार्ट समूह आणि फोनपे ई-कॉमर्स, पेमेंट्स, पुरवठा साखळी आणि इतर क्षेत्रात भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांसाठी उपायांची रचना आणि अंमलबजावणी करत आहेत. हे उपाय भारतातील विविध समुदायांमध्ये प्रवेश आणि वाढ घडवून आणतात, तर जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये व्यापक, स्थानिक पातळीवर संबंधित मॉडेल तयार करण्याच्या वॉलमार्टच्या दृष्टिकोनाला आकार देण्यास मदत करतात.” त्या पुढे म्हणाल्या की, “एमएसएमईचे सक्षमीकरण आणि निर्यातीला गती देण्यापासून ते ग्राहकांचा अनुभव वाढवण्यापर्यंत आम्ही भारतासोबत वाढ करण्यासाठी वचनबद्ध आहोत. येत्या काही वर्षांत आम्हाला आणखी ग्राहक, भागीदार आणि समुदायांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करता येईल अशी आशा आहे.”
मागील २०+ वर्षात वॉलमार्टने भारतात डिजिटल कॉमर्स, जागतिक सोर्सिंग, तंत्रज्ञान, आर्थिक समावेशन आणि समुदाय विकास यासारख्या क्षेत्रात व्यापक आणि वाढत्या प्रमाणात उपस्थिती निर्माण केली आहे. कंपनीने रोजगार निर्मितीत योगदान दिले आहे. तसेच भारतात आणि भारताबाहेर कार्यरत असलेल्या विविध संस्थांद्वारे व्यवसायांसाठी बाजारपेठ प्रवेश देखील सक्षम केला आहे. या प्रदर्शनात दीर्घकालीन प्रभाव टाकणाऱ्या अनेक प्रमुख उपक्रमांचा समावेश होता:
• फ्लिपकार्ट मार्केटप्लेस: फ्लिपकार्ट ई-कॉमर्स आपली व्याप्ती वाढवत आहे. त्यामुळे टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये लघु व्यवसाय आणि ग्राहकांना सक्षम केले जाते. फ्लिपकार्ट १.४ दशलक्ष (१४+ लाख) विक्रेत्यांचा आधार असून त्यातील बरेच एमएसएमई आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा त्यांच्या विविध उपक्रमांच्या केंद्रस्थानी असतात.
• फ्लिपकार्ट समर्थ: फ्लिपकार्ट समर्थ हजारो कारागीर, विणकर आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना प्रशिक्षण आणि समर्पित बाजारपेठ प्रवेशासह समर्थन देत आहे.
• फ्लिपकार्ट मिनिट्स: फ्लिपकार्टची जलद वाणिज्य सेवा केवळ १० मिनिटांत किराणा, स्नॅक्स आणि वैयक्तिक काळजी वस्तूंसारख्या आवश्यक वस्तूंची डिलिव्हरी देते. ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेली ही सेवा ग्राहकांचा अनुभव वाढवण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादन मिश्रणाचा विस्तार करत आहे.
• शॉप्सी: हा उद्योजक आणि लघु व्यवसायांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला एक हायपर व्हॅल्यू ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असून तो विशेषतः टियर-२ आणि टियर-३+ शहरांमधील ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी उपयुक्त आहे.
• मिंत्रा: मिंत्रा भारतातील फॅशन ई-कॉमर्समध्ये आघाडीवर आहे, ते ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि डेटा-चालित धोरणांचा वापर करते. मिंत्राने २०२५ मध्ये सिंगापूरमध्ये मिंत्रा ग्लोबल आणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला. त्यातून मूळच्या भारतीयांना लक्ष्य केले गेले.
• सुपर.मनी: हा फ्लिपकार्टचा फिनटेक प्लॅटफॉर्म जून २०२४ मध्ये बाजारात आला. तो ग्राहकांना क्रेडिट-फर्स्ट यूपीआय सेवा देतो. हे अॅप एनपीसीएच्या रूपे या पायाभूत सुविधांशी एकत्रित होते आणि भारतात वित्तीय सेवांमध्ये प्रवेश करताना सुरक्षित कार्ड, मुदत ठेवी आणि कर्ज सेवा समाविष्ट करण्यासाठी त्याच्या उत्पादनांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.
• क्लिअरट्रिप: ही एक जागतिक ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी असून ती आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे व्यापक प्रवास बुकिंग अनुभव देते.
• फोनपे लिमिटेड (पूर्वीची फोनपे प्रायव्हेट लिमिटेड): फोनपे आपल्या ६०० दशलक्ष (६०+ कोटी) पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह संपूर्ण भारतात डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश वाढवत आहे. फोनपेच्या व्यवसायांच्या पोर्टफोलिओमध्ये त्याच्या मुख्य पेमेंट व्यवसायाव्यतिरिक्त भारतातील वित्तीय उत्पादनांचे वितरण (विमा, कर्ज देणे आणि संपत्ती), तसेच नवीन ग्राहक तंत्रज्ञान व्यवसाय (पिनकोड – हायपरलोकल ईकॉमर्स आणि इंडस अॅपस्टोअर – अँड्रॉइड इकोसिस्टमसाठी स्थानिकीकृत अॅप स्टोअर) समाविष्ट आहे. ते प्रत्येक भारतीयाला रोख प्रवाह आणि सेवांमध्ये प्रवेश देऊन करून त्यांची वेगाने प्रगती करण्याची समान संधी देण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
• वॉलमार्ट सोर्सिंग: वॉलमार्टने आधीच भारतातून ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू निर्यात केल्या आहेत आणि २०२७ पर्यंत वार्षिक १० अब्ज डॉलर्स निर्यातीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे.
• वॉलमार्ट वृद्धी: वॉलमार्ट वृद्धी पुरवठादार विकास कार्यक्रमाद्वारे आजपर्यंत ७०,००० हून अधिक एमएसएमईंना प्रशिक्षित केले आहे. तसेच यातून २०२८ पर्यंत व्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त १००,००० एमएसएमईंना सक्षम करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश वाढेल.
• वॉलमार्ट ग्लोबल टेक: वॉलमार्टची टीम एआय, ऑटोमेशन आणि डेटा सायन्समध्ये प्रगत उपाय विकसित करत आहे. त्यामुळे वॉलमार्टच्या जागतिक ऑपरेशन्समध्ये नावीन्य आणले जात आहे. त्यात जागतिक बाजारपेठेचा समावेश आहे. त्यात विक्रेत्यांना ऑनबोर्ड होऊन सर्व बाजारपेठांमध्ये विक्री करण्याची परवानगी मिळते. त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये एक सीओईदेखील सुरू केला आहे. तो नफा, सुरक्षितता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी एआय आणि कौशल्य विकासाचा अवलंब करून भारतीय एमएसएमईच्या वाढीस पाठबळ देतो.
• वॉलमार्ट फाउंडेशन: ही वॉलमार्टची परोपकारी शाखा असून ती भारतातील लहान शेतकऱ्यांना प्रशिक्षण, साधने (तंत्रज्ञानासह) आणि शाश्वत उपजीविकेच्या संधींसह अनुदानित संस्थांद्वारे मदत करते.
या कार्यक्रमात अनेक विचारवंतांनीही सहभाग घेतला. त्यांनी भारताच्या आर्थिक विकास आणि निर्यात महत्त्वाकांक्षा आणि “मेक इन इंडिया” व्हिजनमध्ये वॉलमार्टचे योगदान स्पष्ट केले. इंडिया शोकेसपूर्वी म्हणजे २३ जून रोजी, वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टने निवडक विक्रेत्यांसह वॉलमार्ट फ्लिपकार्ट विक्रेता बैठकीचे आयोजन केले होते. त्यात वॉलमार्ट मार्केटप्लेस आणि वॉलमार्ट वृद्धीद्वारे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी मते व्यक्त करण्यात आली.
वॉलमार्टबाबत
वॉलमार्ट आयएनसी. (एनवायएसई: डब्ल्यूएमटी) ही एक सार्वजनिक नेतृत्वाखालील, तंत्रज्ञानावर चालणारी रिटेलर आहे. ती – कधीही आणि कुठेही – स्टोअरमध्ये, ऑनलाइन आणि त्यांच्या मोबाइल डिव्हाइसद्वारे लोकांना पैसे वाचवण्यास आणि उत्तम आयुष्यासाठी मदत करते. दर आठवड्याला अंदाजे २७० दशलक्ष ग्राहक आणि सदस्य १९ देशांमध्ये १०,७५० हून अधिक स्टोअर्स आणि असंख्य ई-कॉमर्स वेबसाइट्सना भेट देतात. २०२५ या आर्थिक वर्षाच्या ६८१ अब्ज डॉलर्सच्या कमाईसह वॉलमार्ट जगभरात अंदाजे २.१ दशलक्ष सहयोगींना रोजगार देते. वॉलमार्ट शाश्वतता, कॉर्पोरेट परोपकार आणि रोजगाराच्या संधींमध्ये आघाडीवर आहे. वॉलमार्टबद्दल अतिरिक्त माहिती corporate.walmart.com ला भेट देऊन, फेसबुकवर facebook.com/walmart वर, X वर (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) twitter.com/walmart वर आणि LinkedIn वर linkedin.com/company/walmart वर मिळू शकते.
भारतात वॉलमार्टबाबत
वॉलमार्ट अशा भविष्यासाठी वचनबद्ध आहे जिथे भारतातील रिटेल विक्री ही खरेदी अनुभवांचे मिश्रण असेल. त्यातून भारतीय ग्राहकांना, पुरवठादारांना, उत्पादकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना सर्वोत्तम सेवा दिली जाईल. वॉलमार्ट एक सर्वसमावेशक परिसंस्था तयार करत आहे, ज्यात होलसेल कॅश-अँड- कॅरी व्यवसाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, पेमेंट आणि वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म, तसेच लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षमतांचा समावेश असून ते वॉलमार्टद्वारे समर्थित मजबूत स्थानिक व्यवसाय आहेत.
वॉलमार्ट स्थानिक विक्रेते आणि पुरवठादारांना मदत करणाऱ्या कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये गुंतवणूक करते. त्यात किराणा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग (एमएसएमई), शेतकरी, कारागीर आणि महिलांच्या मालकीचे व्यवसाय यांचा समावेश आहे. त्यातून देशात आधुनिकीकरण, समृद्धी आणि स्थानिक नोकऱ्या आणल्या जातात.
आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी, दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वतता वाढवण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकट करण्यासाठी वचनबद्ध असलेली सामाजिकदृष्ट्या जबाबदार संस्था म्हणून वॉलमार्ट भारताची यशोगाथा पुढे नेण्यास आणि सामायिक मूल्य निर्माण करण्यासाठी मदत करण्यास कटिबद्ध आहे.


