Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोनी इंडियाने सुधारित आणि अद्ययावत फ्लॅगशिप Alpha™ 1 II फुल-फ्रेम कॅमेरा केला...

सोनी इंडियाने सुधारित आणि अद्ययावत फ्लॅगशिप Alpha™ 1 II फुल-फ्रेम कॅमेरा केला सादर

व्यावसायिक वापरासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या कॅमेरामध्ये जास्त रेझोल्यूशन, वेग आणि AI ओळख यांचे मिश्रण

 

 

 

1. 50.1 MP (अंदाजे, प्रभावी) Exmor RS™ स्टॅक्ड CMOS सेन्सर आणि शक्तिशाली BIONZ XR™ इमेज प्रोसेसिंग इंजिन

 

2. अत्याधुनिक AI प्रोसेसिंग युनिट, स्टिल्स आणि मूव्हीजसाठी रिअल-टाइम रेकग्निशन AF प्राप्त करते

 

3. प्री-कॅप्चर आणि सातत्यपूर्ण शूटिंग स्पीड बूस्ट फंक्शन्ससह 30fps चे अत्याधुनिक रिअल-टाइम ट्रॅकिंग

 

4. प्रभावशाली वास्तवतेसाठी 8K 30p आणि 4K 120p मूव्ही रेकॉर्डिंग

 

5. 8.5-स्टेप सेंट्रल आणि 7.0-स्टेप पेरिफेरल कॉम्पेन्सेशनसह इमेज स्टॅबिलायझेशन

 

6. एर्गोनॉमिक ग्रिप आणि बटणांमुळे वापरायला आरामदायक आणि उच्च प्रतिसादक्षम कार्यशक्ती

 

7. सप्लाईड चार्जर 155 मिनिटांत दोन NP-FZ100 बॅटऱ्या चार्ज करतो

 

8. Alpha सिरीज पर्यावरणपूरक पॅकेजिंग सादर करते

 

 

 

नवी दिल्ली, 23 जून 2025: सोनी इंडियाने आज सोनीच्या अत्याधुनिक AI प्रोसेसिंग युनिटद्वारे समर्थित Alpha™ 1 II हा सुधारित आणि अद्ययावत नवीन फ्लॅगशिप फुल-फ्रेम मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा सादर केला. या कॅमेरामध्ये अंदाजे 50.1 MP (मेगापिक्सेल) प्रभावी रिझोल्यूशन असलेला सेन्सर आहे, AF/AE ट्रॅकिंग[i]सह 30 fps (फ्रेम्स-पर-सेकंद) ब्लॅकआउट-फ्री कंटिन्युअस शूटिंग, अँटी-डिस्टॉर्शन शटर आणि मध्यम ते उच्च सेंसिटिव्हिटीवर सुधारित इमेज स्पष्टता आहे. AI प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रगत AI आधारित सब्जेक्ट रेकग्निशन परफॉर्मन्स असून नवीन “Auto” मोडसह विविध प्रकारच्या सब्जेक्ट्स ओळखण्याची क्षमता आहे. जोडीला Alpha 1 II मध्ये Alpha 9 III मधील नाविन्यपूर्णताही समाविष्ट आहे. यात 1 सेकंदापर्यंतचा[ii] प्री-कॅप्चर आणि सुधारित एर्गोनॉमिक डिझाइन आहे. हा कॅमेरा हलक्या वजनाचा असून सुमारे 743 ग्रॅम्स (1 lb, 7.3 oz) [iii] वजन आहे. यामुळे विविध व्यावसायिक वापरांसाठी सुलभ आहे.

 

 

 

सोनी इंडियाच्या इमेजिंग व्यवसायाचे प्रमुख मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “Alpha 1 II हा डिजिटल इमेजिंग श्रेणीच्या व्यावसायिक क्षेत्रातील सोनीच्या नेतृत्वाचा परिपाक आहे. उच्च रिझोल्यूशन, उत्कृष्ट वेग, प्रगत AI-समर्थित सब्जेक्ट रेकग्निशन आणि विनाअडथळा वर्कफ्लो एन्हान्समेंट्सच्या मिश्रणाने हे प्रमुख मॉडेल उद्योगक्षेत्रासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करते. आधुनिक व्हिज्युअल स्टोरीटेलिंगसाठी आवश्यक असलेले सर्जनशील स्वातंत्र्य आणि विश्वासार्हता देण्याच्या उद्देशाने हा कॅमेरा खास तयार करण्यात आला आहे.”

 

 

 

 

 

1. 50.1 MP (अंदाजे, प्रभावी) Exmor RS™ स्टॅक्ड CMOS सेन्सर आणि शक्तिशाली BIONZ XR™ इमेज प्रोसेसिंग इंजिन

 

Alpha 1 II हा कॅमेरा अंदाजे 50.1 प्रभावी MP रिझोल्यूशन असलेल्या फुल-फ्रेम Exmor RS® स्टॅक्ड CMOS सेन्सर आणि अत्याधुनिक BIONZ XR® इमेज प्रोसेसिंग इंजिन यांच्या मिश्रणातून विस्तृत डायनॅमिक रेंजसह उच्च-रेझोल्यूशन प्रतिमा निर्माण करतो. APS-C क्रॉप मोडमध्येही हा कॅमेरा उच्च रिझोल्यूशन प्रतिमा सादर करत सुमारे 21 प्रभावी MP पर्यंत कॅप्चर करतो.

 

2. अत्याधुनिक AI प्रोसेसिंग युनिट, स्टिल्स आणि मूव्हीजसाठी रिअल-टाइम रेकग्निशन AF प्राप्त करते

 

AI प्रोसेसिंग युनिटच्या समावेशासह नवीन Alpha 1 II मध्ये रिअल-टाइम रेकग्निशन AF देखील जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान व्यक्तीचे डोके आणि धड लगेच ओळखणाऱ्या मानवी शारीरिक ठेवण अंदाज यांसह सब्जेक्ट्सवर फोकस राखते. तसेच प्राणी, पक्षी, कीटक आणि वाहनांचा अचूकपणे ट्रॅक करते. Alpha 1 II मध्ये रिअल-टाइम रेकग्निशन AF च्या ताज्या प्रगत आवृत्तीची ओळख करून देण्यात आली असून, यामध्ये “Auto” नावाचे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. हे सब्जेक्ट मोड[iv] निर्देशीत न करता आपोआप टार्गेट ओळखतो.

 

3. प्री-कॅप्चर आणि सातत्यपूर्ण शूटिंग स्पीड बूस्ट फंक्शन्ससह 30fps चे अत्याधुनिक रिअल-टाइम ट्रॅकिंग

 

हा कॅमेरा AF/AE ट्रॅकिंगसह प्रत्येक सेकंदाला[v], 30 फ्रेम्सपर्यंत ब्लॅकआउट-फ्री जलद वेगात सातत्यपूर्ण शूटिंग करू देतो. यात AF/AE कॅल्क्युलेशन्ससह प्रत्येक सेकंदाला[vi] 120 वेळा जटिल हालचाली ट्रॅक करता येऊ शकतात. या कॅमेरामध्ये प्रचंड मागणी असलेले Pre-Capture फंक्शनही आहे. यामुळे शटर बटण दाबण्याच्या[vii] एक सेकंद आधीपर्यंत प्रतिमा कॅप्चर करता येऊ शकते. यासोबतच सातत्यपूर्ण शूटिंग स्पीड बूस्ट फंक्शन देखील आहे. त्यामुळे काही वेळेसाठी बर्स्ट शूटिंग स्पीड बदलता येऊ शकतो.

 

4. प्रभावशाली वास्तवतेसाठी 8K 30p आणि 4K 120p मूव्ही रेकॉर्डिंग

 

4K (3840 x 2160) चित्रफीत 8K स्त्रोत फुटेजमधून क्रॉप व एडिट केली जाऊ शकते. त्यामध्ये 8.6K ओव्हरसॅम्पलिंगमधून अफाट रिझोल्यूशन मिळते. 8K 4:2:2 10-bit XAVC HS रेकॉर्डिंग वैकल्पिक Full HD प्रॉक्सी सह उपलब्ध आहे. तसेच XAVC HS, S किंवा S-I फॉरमॅट्समध्ये फुल-फ्रेम किंवा 5.8K पासून ओव्हरसॅम्पल केलेल्या Super 35 mm मध्ये 4K रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. यामध्ये फुल पिक्सेल रीडआउट सह असून कोणतेही पिक्सेल बिनिंग करत नाही. XAVC S-I मध्ये 600 Mbps पर्यंत रेकॉर्डिंग शक्य असून, अप्रतिम इमेज क्वालिटी मिळते.

 

 

 

5. 8.5-स्टेप सेंट्रल आणि 7.0-स्टेप पेरिफेरल कॉम्पेन्सेशनसह इमेज स्टॅबिलायझेशन

 

व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी आवश्यक असलेल्या उच्च-कामगिरी वेगासाठी Alpha 1 II मध्ये अँटी-डिस्टॉर्शन शटर आहे. ते कमीत कमी डिसटॉरशनसह शूटिंग करू देते. मध्यम ते उच्च सेंसिटिव्हिटीवर कमी आवाज असलेल्या परफॉर्मन्सला व्यावसायिक छायाचित्रकारांकडून प्रचंड मागणी आहे. ती ट्युनिंगद्वारे सुधारण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही इनडोअर स्पोर्ट्ससारख्या उच्च शटर स्पीड आवश्यक असलेल्या परिस्थितीतही कमी आवाज आणि स्पष्ट पार्श्वभूमीसह प्रतिमा टिपू शकता. जोडीला Alpha 1 II मध्ये स्थिर प्रतिमा शूटिंगसाठी केंद्रभागात 8.5 स्टॉप्स आणि पेरीफेरीमध्ये[viii] 7.0 स्टॉप्स इतकी प्रभावी सुधारित ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे. तसेच व्हिडिओ शूटिंगसाठी[ix] नवीन Dynamic Active Mode चा सपोर्ट देखील आहे.

 

6. एर्गोनॉमिक ग्रिप आणि बटणांमुळे वापरायला आरामदायक आणि उच्च प्रतिसादक्षम कार्यशक्ती

 

कॅमेरामध्ये 3.2-टाइप LCD मॉनिटर असून त्यामध्ये खूप मागणी असलेले 4-अॅक्सिस मल्टी-अँगल फीचर आहे. ते कोणत्याही कोनात सहज समायोजित करता येते. ही सुधारित कॅमेरा बॉडी मूळ Alpha 1 च्या तुलनेत अधिक चांगल्या एर्गोनॉमिक्ससह सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रिप, शटर बटणाची स्थिती आणि कस्टम बटणांमध्ये विचारपूर्वक डिझाईन बदल करण्यात आले आहेत. Alpha 1 II मध्ये एक नवीन डीप-टाइप पॅडेड आयपीस कप (मॉडेल FDA-EP21) अ‍ॅक्सेसरी समाविष्ट आहे. त्यामुळे अधिक चांगला व्ह्यूइंग सपोर्ट मिळतो. एक स्टँडर्ड आयपीस कॅमेऱ्यावर आधीच लावलेले असते, परंतु वापरकर्त्याच्या पसंतीनुसार ते डीप पॅड पर्यायाने बदलता येते.

 

7. सप्लाईड चार्जर 155 मिनिटांत दोन NP-FZ100 बॅटऱ्या चार्ज करतो

 

अतिरिक्त बॅटरी सपोर्टसाठी Alpha 1 II मध्ये BC-ZD1 ड्युअल-बॅटरी चार्जर समाविष्ट आहे. तो एकाच वेळी दोन Z बॅटऱ्या (मॉडेल NP-FZ100) एकाचवेळी स्थिर, सलग आणि जलद 155 मिनिटांत पूर्ण चार्ज[x] करतो. जोडीला, VG-C5[xi] सुसंगत व्हर्टिकल ग्रिप अधिक एर्गोनॉमिक सपोर्ट पुरविते. त्यामुळे अधिक शूटिंग गरजांकरिता अधिक बॅटरी परफॉर्मन्स मिळतो.

 

ज्या व्यावसायिकांना जलद, ताबडतोब प्रतिमा ट्रान्सफर करण्याचा उपाय हवा आहे त्यांच्यासाठी Alpha 1 II मध्ये 2.5GBASE-T व्हाया वायर्ड LAN सपोर्ट आहे. ही उच्च दर्जाची कनेक्टिव्हिटी डेटा ट्रान्सफरपासून आशय निर्मिती आणि वितरणापर्यंतचा वर्कफ्लो लक्षणीय सुधारते आणि व्यावसायिकांची कार्यक्षमता वाढवते. याशिवाय, सोनीच्या Creators’ Cloud[xii] या क्लाउड स्टोरेज सेवेद्वारे Adobe Lightroom™ किंवा Google Drive™ वर कॅप्चर केलेला डेटा आपोआप ट्रान्सफर केला जाऊ शकतो. यामुळे शूटिंगनंतरचे एडिटिंग अधिक सोपे, सुलभ बनते.

 

8. Alpha सिरीज पर्यावरणपूरक पॅकेजिंग सादर करते

 

शाश्वततेस प्राधान्य देण्यासाठी, या मॉडेलचे पॅकेजिंग पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आले आहे. बांबू, ऊस आणि पुर्नप्रक्रिया केलेल्या कागदाचे[xiii] अद्वितीय मिश्रण असलेले सोनीचे आरिजिनल ब्लेंडेड मटेरियल वापरणारे हे सोनीच्या अल्फा सिरीजमधील (ZV-सिरीज वगळून) पहिले असे कॅमेरा मॉडेल आहे.

 

 

 

किंमत आणि उपलब्धता

 

Alpha™ 1 II फुल-फ्रेम कॅमेरा सर्व सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशीप स्टोअर्स, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स, www.ShopatSC.com तसेच भारतातील इतर ई-कॉमर्स पोर्टल्सवर 25 जून 2025 पासून पुढे उपलब्ध असेल.

 

मॉडेल नाव

 

सर्वोत्तम किंमत (भारतीय रु. मध्ये)

 

उपलब्धता

 

ILCE-1M2/BQ IN5

 

579,990/-

 

25 जून 2025 पासून पुढे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments