Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमीमीज आईस्क्रीम्सचे अधिग्रहण करून वॉको फूड कंपनीने आर्टिसनल डेझर्ट पोर्टफोलिओमध्ये केला विस्तार

मीमीज आईस्क्रीम्सचे अधिग्रहण करून वॉको फूड कंपनीने आर्टिसनल डेझर्ट पोर्टफोलिओमध्ये केला विस्तार

पुणे, 24 जून 2025 – भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम आईस्क्रीम आणि डेझर्ट ब्रँड्सपैकी एक असलेल्या वॉको फूड कंपनीने मीमीज आईस्क्रीम्सचे अधिग्रहण केले आहे. ही धोरणात्मक खरेदी वॉकोच्या भारतातील गतिमान आर्टिसनल डेझर्ट मार्केटमधील प्रवेश ठळकपणे दाखवून देत असून त्यांच्या नाविन्यपूर्ण, हाताने तयार केलेल्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओला अधिक मजबूत करत आहे.

 

 

 

मुंबईमध्ये स्थापन झालेल्या मीमीजने विशेषतः शहरी तरुण ग्राहकांमध्ये टोस्टीज, आईसक्रीम केक्स, रोलीज आणि टबस्टर्स यांसारख्या हटके, उच्च-गुणवत्तेच्या निर्मितीतून एक विश्वासू ग्राहक आणि चाहतावर्ग निर्माण केला आहे. या ब्रँडची ओळख त्याच्या खेळकर शैली, ठळकपणे जाणवणारी चव आणि प्रयोगशील स्वरूपासाठी आहे. मीमीज उत्पादनांमध्ये सामावून जात वॉको कंपनी शहरी बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याचा आणि प्रारंभीच्या टप्प्यात डायरेक्ट टू कनझ्यूमर (D2C) चॅनेल्समध्ये वाढीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

 

वॉको फूड कंपनीचे संचालक श्री. राज भंडारी म्हणाले, “हे अधिग्रहण म्हणजे डेझर्ट वापराच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. ग्राहकांची पसंती अस्सलता आणि नाविन्यपूर्ण, अनुभवात्मक आनंदाकडे वळताना दिसते आहे आणि अशा वेळी मीमीजची जोशपूर्ण ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. वॉकोचे संपूर्ण देशभरातील स्थान, डिजिटल-फर्स्ट वितरण मॉडेल आणि संशोधन व विकास क्षमतेच्या जोरावर आम्ही ग्राहकांना एक अविस्मरणीय डेझर्ट अनुभव देण्यास तयार आहोत असा आम्हाला विश्वास आहे.”

 

 

 

100 हून अधिक शहरांमध्ये मजबूत पायाभूत सुविधांचे पाठबळ असलेल्या वॉकोकडे भारताच्या 44,000 कोटी रु.च्या (5.33 अब्ज अमेरिकन डॉलर) आईस्क्रीम मार्केटमध्ये मीमीजला प्रवेश मिळवून देण्याची योग्य संधी आहे. आईस्क्रीम बाजारपेठ 2028 पर्यंत सुमारे 11% च्या CAGR दराने वाढण्याचा अंदाज आहे. NIC आईस्क्रीम, ग्रामीण कुल्फी आणि मिमो आईस्क्रीम हे वॉकोचे प्रमुख ब्रँड्स स्वीगी, झोमॅटो, स्वीगी इनस्टामार्ट, झेप्टो, ब्लिंकिट, अॅमेझॉन फ्रेश, अॅमेझॉन नाऊ, बिग बास्केट नाऊ, फ्लिपकार्ट मिनीट्स, जिओ मार्ट यांसारख्या आधुनिक रिटेल स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या अनोख्या सिंगल-ब्रँड वितरण नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

 

 

 

मीमीजच्या संस्थापिका मेहा अग्रवाल म्हणाल्या, “वॉकोसोबतची भागीदारी हे मीमीजसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे. वॉकोच्या दृष्टीकोनामुळे आणि वितरण कौशल्यामुळे आम्हाला नाविन्यपूर्ण चव तयार करण्यावर लक्ष केंद्रित करता येत आहे. त्यायोगे डेझर्टप्रेमींना आनंद मिळवून देत भारतभरातील फ्रिझर्स आणि ग्राहकांच्या हृदयात पोहोचता येत आहे.”

 

 

 

2012 मध्ये जीतेन्द्र भंडारी, संजीव शाह आणि राज भंडारी यांनी स्थापन केलेल्या वॉको फूड कंपनीने NIC, ग्रामीण कुल्फी, कॅफे चोकोलेड, मिमो आणि क्रीम पॉट यासारख्या ब्रँड्स अंतर्गत प्रीमियम आईस्क्रीम्स, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट्स आणि थिक शेक्स मध्ये वैविध्यपूर्ण आणि सतत वाढणारे पोर्टफोलिओ तयार केले आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments