पुणे -पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी विस्तारीत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यावर
मा. माधुरीताई मिसाळ – नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन. यांनी केंद्र सरकारचे विशेष आभार मानले आहेत.
“शहरातील सार्वजनिक वाहतुकीला गतिमान व पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पुणे मेट्रो हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन्ही विस्तारीत मेट्रो मार्ग केंद्र सरकारने मंजूर केल्याची बातमी अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होऊन पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता, वेळेची बचत आणि सुरक्षिततेचा मोठा फायदा होणार आहे.
वनाज ते चांदणी चौक मार्ग हा प्रचंड वाढत्या रहदारीसाठी दिलासा ठरणार असून, पुणेतील रामवाडी ते विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग शहराच्या विस्तारलेल्या भागांना मुख्य नागरी भागांशी जोडणार आहे. विशेषतः वाघोली परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वसाहतींसाठी ही मेट्रो लाईफलाइन ठरणार आहे.
या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाची वेळेवर मिळालेली मान्यता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाली. त्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील शहरांचा सर्वांगीण विकास वेग घेत आहे. पुणे मेट्रो प्रकल्प हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.


