Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्जास स्टीलकडून तडीपत्रीतील 12 वंचित विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मंजूर कर्नाटकातील यशवंतनगर...

अर्जास स्टीलकडून तडीपत्रीतील 12 वंचित विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मंजूर कर्नाटकातील यशवंतनगर येथील प्रतिष्ठित संदूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 10 मुली आणि 2 मुलांसाठी 100% मोफत निवासी शिक्षणाची व्यवस्था प्रवेश परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे करण्यात 10वी उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची निवड आली आहे.

26 जून 2025 पुणे अर्जास स्टीलने कर्नाटकमधील संदूर, यशवंतनगर येथील संदूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियांत्रिकीमधील आवडत्या शाखेत शिक्षण घेण्यासाठी 12 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांना या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी निवासी व्यवस्था व शिक्षणासाठी 100% शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. “संदूर विद्या प्रोत्साह शिष्यवृत्ती” (एसव्हीपीएस) या अर्जास स्टीलच्या उपक्रमांतर्गत 10 मुली आणि 2 मुले या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरले आहेत. वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे ही शिष्यवृत्ती दिली जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग या शाखांमध्ये डिप्लोमा कोर्स करण्याची संधी मिळते.

 

“वर्ष 2025 साठी ‘संदूर विद्या प्रोत्साह शिष्यवृत्ती’ (SVPS) जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यंदा तडीपत्री मंडल परिसरातील गावांमधून 10 मुली आणि 2 मुलांची निवड करण्यात आली आहे. अर्जास स्टील्सतर्फे आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतो. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा आणि भविष्यात आणखी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे अर्जास स्टील्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पसुपुलेटी आनंद म्हणाले.

 

तडीपत्री मंडल आणि परिसरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी एसव्हीपीएस कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत कर्नाटकमधील संदूर येथील प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या यशवंतनगरच्या संदूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 100% मोफत निवासी शिक्षणाची संधी दिली जाते.

 

श्री. आनंद पुढे म्हणाले, “एसव्हीपीएस कार्यक्रमांतर्गत दर विद्यार्थ्यामागे दर वर्षी अंदाजे ₹1.5 लाख खर्च केला जाणार असून, त्यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृहाची सोय, गणवेश, पुस्तके आणि इतर आवश्यक गोष्टींचा समावेश असेल. हे संपूर्ण पाठबळ तीन वर्षांच्या पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी असेल. ग्रामीण भागातील वंचित तरुणांसाठी शिक्षणाच्या संधी वाढवण्याचा आणि त्यांच्या भविष्य घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

 

(श्री. नागराजू गरू (एमईओ, तडीपत्री), श्री. जयप्रकाश देवराज गरू (सीओओ), श्री. राजेश रंजन ठाकुर गरू (प्लांट एचआर), श्री. नरेंद्र मिसा गरू (सीएसआर समन्वयक) आणि अर्जास स्टील्सच्या इतर कर्मचारी सदस्यांच्या हस्ते या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे प्रदान करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमासाठी उपस्थिती होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments