Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंघ शिक्षा वर्गाचा रविवारी समारोप 

संघ शिक्षा वर्गाचा रविवारी समारोप 

 

 

पुणे, ता. २६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप रविवारी (रविवार, २९ जून २०२५) सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगरच्या व्हीआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

 

या जाहीर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के.जे. एज्युकेशन इन्स्टिट्यूट अॅन्ड रिसर्चचे अध्यक्ष कल्याणराव जाधव, खेतेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष दौलतसिंग राजपुरोहित उपस्थित असतील.

तर प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांचे मार्गदर्शन होणार आहे.

 

वर्गाचे सर्वाधिकारी महेश भाटिया आणि कात्रज भाग संघचालक शिवाजी मालेगावकर या वेळी उपस्थित असतील.

 

उच्च महाविद्यालयीन आणि व्यावसायिक क्षेत्रातील शिक्षार्थींचा प्रशिक्षणात समावेश आहे. प्रशिक्षण काळात शिक्षार्थ्यांनी प्राप्त केलेल्या शारिरीक आणि बौद्धिक कौशल्यांचे प्रदर्शन यावेळी होईल.

..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments