गुरूवार दि. २६ जून २०२५ रोजी नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील पहिला दिवस , महाकवी कालिदास दिन म्हणजेच संस्कृत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन दीप प्रज्वलन व महाकवी कालिदासाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “संस्कृत ही देववाणी म्हणून गौर्वलेली भाषा आहे,संस्कृतमुळे उच्चार अधिक स्पष्ट होतात म्हणूनच आपल्या शाळेत मौखिक संस्कृत विषय स्वतंत्रपणे घेतला जात आहे.त्यातील सर्व उपक्रमात मुलांनी सहभागी व्हावे.” असे सांगितले.तिसरी मुठा व चौथी शिवनेरी च्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून शाळेची माहिती ,संस्कृत गीते व श्लोक , शंकर स्तोत्र, गोष्ट, शिवरायांची माहिती,संस्कृत मधून केले.शालासमिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सौ.स्वप्ना वाबळे यांनी सूत्रसंचालन केले . सौ. मनिषा कदम यांनी महाकवी कालिदास यांची माहिती सांगितली. सौ.भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले.ज्येष्ठ शिक्षक सौ. तनुजा तिकोने ,धनंजय तळपे,यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


