Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनिका प्लास्टेक लि. या हाय परफॉर्मन्स पॉलिमर पॅकेजिंग उत्पादक कंपनीतर्फे ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी...

मनिका प्लास्टेक लि. या हाय परफॉर्मन्स पॉलिमर पॅकेजिंग उत्पादक कंपनीतर्फे ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी डीआरएचपी दाखल

मनिका प्लास्टेक लिमिटेड ही डिझाईन-केंद्रित, अचूकतेने अभियांत्रिकी केलेली, कठीण स्वरूपाची (रिजिड) पॉलिमर पॅकेजिंग उत्पादने तयार करणारी कंपनी असून तिने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीएचआरपी) दाखल केला आहे.

 

 

 

या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये कंपनीचे २ रुपये दर्शनी मूल्याचे ११५ कोटी रुपयांच्या नवीन समभागांचा (फ्रेश इश्शू) तसेच प्रवर्तक ‘वृदा होल्डिंग ट्रस्ट’कडील एकूण १.५ कोटी समभागांच्या विक्रीसाठीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल – ओएफएस) आहे.

 

 

 

निकुंज मोहनलाल कपाडिया, मुंजाल निकुंज कपाडिया, मिहीर निकुंज कपाडिया, प्रतीक निकुंज कपाडिया आणि वृदा होल्डिंग ट्रस्ट हे कंपनीचे प्रमुख प्रवर्तक आहेत.

 

 

 

मनिका प्लास्टेक लिमिटेड ही कंपनी ऊर्जा साठवण, दुग्धजन्य व खाद्यपदार्थ, पेन्ट्स, रसायने अशा विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी डिझाईन-केंद्रित आणि अचूक अभियांत्रिकी पद्धतीने तयार केलेली पॉलिमर पॅकेजिंगची कठीण उत्पादने पुरवते. कंपनीच्या उत्पादनांचे डिझाईन आणि विकास स्वतःच्या संशोधन व विकास विभागात होतो. कंपनीने ‘डिझाईन्स अ‍ॅक्ट, २०००’ आणि ‘डिझाईन्स रूल्स, २००१’ अंतर्गत ३६ डिझाईन्स नोंदवलेली आहेत. त्यातील दोन डिझाईन्स नूतनीकरणासाठी अर्जित आहेत. (संदर्भ : टेक्नोपॅक अहवाल)

 

 

 

विशिष्ट कामगिरी, टिकाऊपणा, उत्पादन सुरक्षितता व कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत, मणिका प्लास्टेक लिमिटेडने अचूक अभियांत्रिकीवर आधारलेला आपला उत्पादन पोर्टफोलिओ विकसित केला आहे. यामध्ये हाय-परफॉर्मन्स बॅटरी केसिंग्ज, पेल्स आणि थिनवॉल कंटेनर्स यांचा समावेश आहे. औद्योगिक आणि इतर कारांसाठी ही उत्पादने वापरण्यात येतात. ही उत्पादने वाहन उद्योग, ऊर्जा साठवण, टेलिकॉम, पेंट्स, ल्युब्रिकंट्स, कृषी रसायने, अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य उत्पादने यांसारख्या विविध क्षेत्रांना पुरवली जातात. प्रिसीजन बॅटरी केसिंग्ज, पेल्स आणि थिनवॉल कंटेनर्स असे रिजिड पॉलिमर घटक इंजेक्शन मोल्डिंग तंत्रज्ञानाने कंपनी तयार करते.

 

आयपीओतून मिळणारा निधी कारखाना व यंत्रसामग्री खरेदीसारख्या भांडवली खर्चासाठी, काही कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड वा पूर्व-परतफेड करण्यासाठी, तसेच इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे.

 

 

 

कंपनी आयएसबीएम (इंजेक्शन स्ट्रेच ब्लो मोल्डिंग) तंत्रज्ञानाचा वापर करून पीईटी बाटल्या, जार्स, कंटेनर्स यांसारखी उत्पादने तयार करणार आहे. ही उत्पादने पर्सनल केअर, सौंदर्यप्रसाधने, पेय पदार्थ आणि औषधउद्योग यांसारख्या क्षेत्रांसाठी असतील.

 

सन २०२३ या कॅलेंडर वर्षात / २०२४ या आर्थिक वर्षात, मणिका प्लास्टेक लि. ही पर्यावरणपूरकतेवर भर देऊन पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक गणली गेली आहे. कंपनी पुनर्वापर करण्याजोग्या व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करते, तसेच ऊर्जासक्षम उत्पादन प्रक्रिया अवलंबते. (संदर्भ: टेक्नोपॅक अहवाल)

 

कंपनीचे डिसेंबर २०२४ पर्यंतचे ९ महिन्यांचे उत्पन्न ३०१.७५ कोटी रुपये आहे. तिने या काळात ११.६९ कोटी रुपयांचा करपश्चात नफा कमावला आहे.

 

सध्या मनिका प्लास्टेक लिमिटेडची उत्पादन यंत्रणा देहराडून, होसूर, पानीपत, उना, दादरा येथील ७ कारखान्यांमध्ये विभागलेली आहे. याशिवाय कंपनीकडे ५ गोदामे आहेत.

 

मनिका प्लास्टेक लिमिटेडच्या ग्राहकांमध्य़े लिव्हगार्ड एनर्जी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., ल्युमिनस पॉवर टेक्नॉलॉजीज प्रा. लि., उनो मिंडा लि., जेएसडब्ल्यू पेन्ट्स लि., इंडिगो पेन्ट्स लि., जोतून इंडिया प्रा. लि., ग्रासिम इंडस्ट्रीज लि., अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह प्रा. लि. या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे.

 

या आयपीओद्वारे जारी होणारे इक्विटी समभाग बीएसई लि. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) या दोन्ही बाजारपेठांमध्ये सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

 

पॅंटोमॅथ कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रा. लि. हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) आहेत.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments