पुणे : सकल हिंदू समाज पुणे यांच्या वतीने अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची महती सांगणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे आज शनिवारी २८ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी तसेच सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक मिलिंद एकबोटे उपस्थित राहणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन सध्या जो वाद चालू आहे, त्याला योग्य उत्तर देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे हे व्याख्यान असेल.
बाजीराव पेशवे हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले राष्ट्रनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने दिल्लीवर आपले वर्चस्व ठेवले. त्यांनी एकही लढाई न हारता असामान्य युद्धनीतीचा परिचय दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या संदर्भातील वादाला केवळ राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. बाजीरावांचा इतिहास अभ्यासून, त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून त्यांना योग्य सन्मान देणे गरजेचे आहे.


