Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedलम्पी स्कीन डीसीज (LUMPY SKIN DISEASE) या विषाणुचा ...

लम्पी स्कीन डीसीज (LUMPY SKIN DISEASE) या विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेबाबत…

लम्पी स्कीन डिसीज हा विषाणु जन्य चर्म रोग असुन जलदगतीने प्रसारीत होणारा साथीचा आजार आहे. हा रोग संसर्गजन्य असुन मोठ्या प्राण्यांमध्ये संक्रमण आढळुन येते.

लम्पी आजाराची कारणे –

कॅप्रीपॉक्स विषाणू मुळे होतो.

लम्पी आजाराची लक्षणे –

१. अंगावर १० ते २० मि.मी. व्यासाच्या गाठी

२. सुरुवातीस भरपूर ताप

३. डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव

४. चारा पाणी खाणे कमी अथवा बंद

५. दूध उत्पादन कमी

६. काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे.

इ. लम्पी आजाराचा रोगप्रसार –

१. डास, चावणाऱ्या माश्या.

२. गोचिड, चिलटे

३. बाधित जनावरांचा स्पर्श.

४. दुषित चारा-पाणी.

ई . पशुपालकांनी घ्यावयाची काळजी. –

चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा.

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासुन वेगळी ठेवणे.

कोणत्याही संभाव्य रोगी जनावरस निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे.

रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे.

डांस, माश्या, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणुन औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.

रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.

त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतु पडु नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे.

प्रतिबंधः पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करुन घ्यावे.

वेळेवर उपचार केल्यास हा रोग

निश्चित बरा होतो.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments