Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमर्सिडीज-बेन्झ इंडियाने भारतात GT फॅमिली मधून सादर केल्या दोन जबरदस्त स्पोर्ट्स कार्स:...

मर्सिडीज-बेन्झ इंडियाने भारतात GT फॅमिली मधून सादर केल्या दोन जबरदस्त स्पोर्ट्स कार्स: मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ आणि रेसिंग प्रेमींसाठी खास ‘GT 63 PRO’

या हाय-परफॉर्मन्स लक्झरी स्पोर्ट्स कार्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, रेस ट्रॅकवर तयार झालेली अभियांत्रिकी आणि “वन मॅन, वन इंजिन” अशी खासियत अनुभवायला मिळते

 

“मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ आणि ट्रॅक-ओरिएंटेड GT 63 PRO 4MATIC+ चे सादरीकरण भारतातील परफॉर्मन्स मोटरिंगप्रेमी समुदायासाठी असलेल्या आमच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. या गाड्या कोणताही तडजोड न करता कामगिरी, अचूक अभियांत्रिकी आणि फक्त हाताने बनवलेल्या AMG इंजिनमधून मिळणारा भावनिक अनुभव अशी AMG ची शुद्ध भावना साकारतात.”

 

“भारतीय ग्राहकांनी मर्सिडीज AMG च्या उच्च कामगिरी करणाऱ्या वाहनांना अफाट प्रतिसाद दिला आहे आणि AMG GT मालिका या उत्कटतेला पूर्ण न्याय देते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च कामगिरीसह AMG GT रेंज हे ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगच्या शिखराचे प्रतिनिधित्व करते. या स्पोर्ट्स कार्सना त्यांच्या सादरीकरणापूर्वीच मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे.”

मर्सिडीज-बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर

 

मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ Coupé

प्रथमच GT 63 मध्ये व्हेरिएबल ऑल-व्हील ड्राइव्ह असून तो उत्कृष्ट ट्रॅक्शन आणि हँडलिंग देतो

समर्पित DRIFT MODE असून हा मोड फक्त रियर व्हील्सना 100% पॉवर देतो.

F1 प्रेरित ‘AMG Active Aerodynamics Technology’ वैशिष्ट्य असलेले GT 63 हे भारतातील पहिले AMG मॉडेल आहे. 100 हून अधिक किमी/तास वेगाने अंडरबॉडी AMG एअरोडायनामिक्समुळे ‘व्हेंच्युरी इफेक्ट’ निर्माण होतो. त्यायोगे गाडीचा नोज भाग जमिनीला चिकटतो आणि त्यामुळे हाय-स्पीड कॉर्नरिंगदरम्यान अधिक मजबूत पकड आणि स्थिरता मिळते

Rear Axle Steering (2.5 अंशांपर्यंत) आणि डायनॅमिक इंजिन माउंट्स स्टँडर्ड यांसह AMG Active Ride Control सस्पेन्शन

मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ देते 430 kW (585 hp) पॉवर आणि 800 Nm टॉर्क

कार 0-100 किमी/तास वेग फक्त 3.2 सेकंदात गाठते; टॉप स्पीड: 315 किमी/तास

 

मर्सिडीज AMG GT 63 PRO 4MATIC+: (GT 63 वर आधारित अधिक उन्नत वैशिष्ट्ये)

ट्रॅकसाठी सिद्ध – AMG Performance Package स्टँडर्ड – फ्रंट व रिअर अ‍ॅक्सल डिफरेंशियलसाठी अ‍ॅक्टिव्ह कूलिंग

AMG Night Package II सहित एअरोडायनामिक पॅकेज स्टँडर्ड

GT 63 PRO AMG एअरोडायनामिक पॅकेज. स्टँडर्ड AMG Carbon Package सह अपग्रेड

सर्व एअरो एलिमेंट्स कार्बन फायबरमध्ये. फ्रंट आणि रिअर अ‍ॅक्सल्सवर अधिक डाउनफोर्स तयार करतात

AMG हाय-परफॉर्मन्स सिरेमिक कंपोझिट ब्रेकिंग सिस्टम स्टँडर्ड आहे.

स्टँडर्ड समर टायर्सच्या जागी PRO मॉडेलमध्ये फॅक्टरी-फिटेड स्पोर्ट्स (Cup टायर्स)

AMG ACTIVE RIDE CONTROL सस्पेन्शन – अ‍ॅक्टिव्ह रोल स्टॅबिलायझेशनसह –हाय-स्पीड हँडलिंग आणि अचूकतेसाठी सुसंगत

AMG अ‍ॅल्युमिनियम ट्रिमसह GT 63 PRO मध्ये स्टँडर्ड

स्टेलर ट्रॅक केंद्रित कामगिरीसाठी मर्सिडीज AMG GT 63 PRO देतो 450 kW (612 hp) पॉवर आणि 850 Nm टॉर्क

3.1 सेकंदात 317 किमी/तास या टॉप स्पीड सह 0-100 किमी/तास

 

AMG GT 63 PRO सादर होणार MANUFAKTUR कलर पर्याय यांसह

MANUFAKTUR Patagonia रेड ब्राईट, MANUFAKTUR Opalith व्हाईट ब्राईट आणि MANUFAKTUR Alpine ग्रे सॉलिड

पर्यायी MANUFAKTUR आंबा रंग उपलब्ध असेल. यात MANUFAKTUR Spectral ब्ल्यू मॅंगो, MANUFAKTUR Opalith व्हाईट Magno, MANUFAKTUR Hyper ब्ल्यू मॅंगो आणि MANUFAKTUR ग्रीन हेल मॅंगो यांचा समावेश आहे.

अ‍ॅक्टिव्ह एअरोडायनॅमिक्स आणि 2.5° रिअर-अ‍ॅक्सल स्टीयरिंग – दोन्ही व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड

मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ ची किंमत: अखिल भारतीय स्तरावर एक्स-शोरूम किंमत 3 कोटी रु.

मर्सिडीज -AMG GT 63 PRO 4MATIC+ ची किंमत: अखिल भारतीय स्तरावर एक्स-शोरूम किंमत 3.65 कोटी रु.

GT 63 ची डिलिव्हरी 2025 च्या चौथ्या तिमाहीपासून सुरू आणि GT 63 PRO ची डिलिव्हरी 2026 च्या पहिल्या तिमाही पासून सुरू

मर्सिडीज-बेन्झ इंडिया लवकरच भारतातील प्रीमियम रेसिंग सर्किट्सवर खास ट्रॅक अनुभव सादर करणार आहे. त्यामुळे AMG प्रेमींना या स्पोर्ट्स कार्सच्या परफॉर्मन्स क्षमतांना अधिक पुढे नेण्याची अद्वितीय संधी मिळेल.

 

मुंबई: भारतातील सर्वाधिक आकर्षक लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेन्झने आज आपल्या प्रसिद्ध ‘GT फॅमिली’मधून नव्या कोऱ्या मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+ आणि ट्रॅक-फोकस्ड मर्सिडीज–AMG GT 63 PRO 4MATIC+ Coupés अशा दोन नवीन स्पोर्ट्स कार्स सादर केल्या. AMG च्या F1-प्रेरित उत्कृष्ट अभियांत्रिकी कामगिरीच्या अग्रस्थानी असलेल्या या कार्स AMG GT फॅमिलीच्या सुधारित आवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. या कार्स रेस-ब्रेड टेक्नोलॉजी आणि दैनंदिन वापरयोग्यतेचा अनोखा संगम साधतात आणि भारतीय परफॉर्मन्स कार प्रेमींसाठी एक अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव सादर करतात.

 

दोन वेगळ्या प्रकारांमधील कामगिरी उत्कृष्टता

मर्सिडीज -AMG GT 63 4MATIC+ Coupé मध्ये हँडक्राफ्टेड 4.0-लिटर V8 बिटर्बो इंजिन असून ते 430 kW (585 hp) आणि 800 Nm टॉर्क निर्माण करते. ही गाडी केवळ 3.2 सेकंदात 0-100 किमी/तास वेग गाठते, तर टॉप स्पीड 315 किमी/तास आहे. रस्ते आणि ट्रॅक अशा दोन्ही वापरासाठी तिची कामगिरी रोमांचकारी आहे.

मर्सिडीज -AMG GT 63 PRO 4MATIC+ हा सर्वात ट्रॅक-फोकस्ड प्रकार आहे, जो 450 kW (612 hp) पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करतो. या मॉडेलमध्ये प्रगत एअरोडायनामिक्स, फ्रंट व्हील आर्चमध्ये रेडिएटर्ससह अपग्रेडेड कुलिंग सिस्टम्स आणि ट्रॅक-ऑप्टिमाइझ्ड घटक दिलेले आहेत. ही गाडी 0-100 किमी/तास फक्त 3.1 सेकंदात गाठते आणि टॉप स्पीड 317 किमी/तास आहे. आजपर्यंत उपलब्ध असलेल्या सर्वात कामगिरी केंद्रित AMG GT चे हे उदाहरण आहे.

 

क्रांतिकारी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी

दोन्ही प्रकारांमध्ये अ‍ॅक्टिव्ह रोल स्टॅबिलायझेशनसह AMG ACTIVE RIDE CONTROL सस्पेन्शन दिले आहेत. पारंपरिक अँटी-रोल बार्सच्या ऐवजी सक्रिय हायड्रॉलिक घटकांचा वापर करून अतुलनीय हँडलिंग अचूकता आणि आराम सादर केला जातो. रोजच्या ड्रायव्हिंग आणि ट्रॅक दोन्ही सिच्युएशन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही यंत्रणा मिलिसेकंदमध्ये रोल मूव्हमेंट्स सक्रियपणे नियंत्रित करते.

अ‍ॅक्टिव्ह एअरोडायनामिक्स AMG GT च्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. AIRPANELयंत्रणे मध्ये उभे व आडवे लूव्हर्स आहेत जे ड्रायव्हिंग कंडिशन्सनुसार एअर फ्लो ऑप्टिमाइझ करतात.

100 किमी/तासच्या वर मागील बाजूस असलेला रिट्रॅक्टेबल स्पॉयलर पाच वेगवेगळ्या पोजिशन्समध्ये कार्य करतो, तर डाउनफोर्स सुधारण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह अंडरबॉडी घटक ‘व्हेंच्युरी इफेक्ट’ तयार करतो.

AMG GT 63 PRO 4MATIC+ मध्ये एरोडायनामिक कार्यक्षमता आणखी पुढे नेण्यात आली आहे. नवीन फ्रंट अ‍ॅप्रॉन, कार्बन फायबरमध्ये बनवलेले अतिरिक्त एअर डिफ्लेक्टर्स आणि मर्सिडीज -AMG ONE प्रमाणे अंडरबॉडी फिन्स यांचा समावेश आहे. या सुधारणा केल्यामुळे फ्रंट अ‍ॅक्सल लिफ्ट 30 किलोने कमी होते आणि रियर डाउनफोर्स सुमारे 15 किलोने वाढते.

अ‍ॅक्टिव्ह रिअर-अ‍ॅक्सल स्टीयरिंग दोन्ही प्रकारांमध्ये स्टँडर्ड आहे. 100 किमी/तास वेगापर्यंत मागील चाकं पुढच्या चाकांच्या विरुद्ध दिशेने असतात. त्यामुळे लवचिकता वाढते. तर 100 किमी/तास वेगाच्या पुढे त्यांची दिशा समान राहते. त्यामुळे स्थिरता वाढते.

 

GT 63 PRO 4MATIC+ मधील ट्रॅक-केंद्रित सुधारणा

मर्सिडीज -AMG GT 63 PRO 4MATIC+ मध्ये ट्रॅकसाठी खास डिझाइन केलेली अत्याधुनिक कुलिंग प्रणाली आहे. डाव्या आणि उजव्या फ्रंट व्हील आर्चमध्ये दोन अतिरिक्त रेडिएटर्स बसवले आहेत, ते कुलिंग परफॉर्मन्स वाढवतात, तर इलेक्ट्रिक पद्धतीने कार्यरत होणारे वॉटर पंप्स डिफरेंशियल्स आणि ट्रान्सफर केसच्या टॉप-माउंटेड रेडिएटर्सना अ‍ॅक्टिव्ह कूलिंग देतात.

स्टँडर्ड साधनामध्ये AMG सिरेमिक हाय-परफॉर्मन्स कॉम्पोझिट ब्रेक्स असून पुढे 6-पिस्टन फिक्स्ड कॅलिपर्स आणि 420 मिमी ब्रेक डिस्क्स यांचा समावेश आहे. वजनाने हलकी क्रॉस-स्पोक डिझाइनमध्ये असलेली AMG Performance 21-इंच फोर्ज्ड व्हील्स हिमालया ग्रे मॅट रंगात आहेत. स्टँडर्ड Michelin Pilot Sport 5S टायर्स आणि जोडीला पर्यायी Michelin Pilot Sport Cup 2R टायर्स विनामूल्य उपलब्ध आहेत.

 

दैनिक वापरासाठी अधिक सुलभता

नवीन AMG GT Coupé मध्ये विस्तारीत डायमेंशनल परिमाण दिले गेले आहेत. त्यामुळे मागील सीट्सवर 1.5 मीटर उंचीपर्यंतच्या व्यक्तीसाठीही आरामदायक जागा उपलब्ध होते.

MBUX इन्फोटेनमेंट यंत्रणेमध्ये पाच वेगवेगळ्या डिस्प्ले स्टाईल्समध्ये विस्तृत AMG-विशिष्ट कंटेंट दिला गेला आहे. त्यामध्ये “AMG Performance” आणि “AMG TRACK PACE” सारख्या खास मेनूजचा समावेश आहे. हे मेनू वाहनाचे निरीक्षण आणि ट्रॅक विश्लेषणासाठी उपयुक्त आहेत.

 

“वन मॅन, वन इंजिन” तत्त्वज्ञान

प्रत्येक AMG इंजिन हे मर्सिडीज AMG च्या अफलाबाघ येथील केंद्रात “वन मॅन, वन इंजिन” तत्त्वज्ञानाला अनुसरून पूर्णपणे हाताने तयार केले जाते. या परंपरेमुळे प्रत्येक इंजिनकडे व्यक्तिगत लक्ष पुरविले जाते आणि कुशल कारागिरीने ते घडवले जाते. आधुनिक Industry 4.0 उत्पादन पद्धतींमुळे गुणवत्ता व कार्यक्षमता वाढते आणि जोडीला वैयक्तिक लक्ष दिले जात असल्यामुळे AMG ची खासियत अबाधित राहते.

AMG चे 4.0-लिटर V8 बिटर्बो इंजिन हे ट्विन-स्क्रोल टर्बोचार्जर्ससह सुसज्ज आहे आणि विशेषतः AMG GT वापरासाठी ऑप्टिमाइझ करण्यात आले आहे. GT 63 PRO 4MATIC+ मध्ये जास्त बूस्ट प्रेशर, अधिक एअर थ्रूपुट आणि सुधारित इंजिन सॉफ्टवेअरमुळे अतिरिक्त पॉवर मिळते.

 

प्रगत ड्रायव्हर सहाय्य आणि ट्रॅक तंत्रज्ञान

AMG GT रेंजमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये नवीन 3D व्हिज्युअलायझेशन संकल्पनेसह समग्र ड्रायव्हर सहायक यंत्रणा पर्यायी स्वरूपात मिळते. AMG TRACK PACE सिस्टम स्टँडर्ड स्वरूपात येते. सखोल ट्रॅक विश्लेषण आणि ड्रायव्हर सुधारणा यासाठी दर सेकंदाला 10 पट 80 पेक्षा अधिक वाहन पॅरामिटर्स रेकॉर्ड केले जाते. सहा AMG DYNAMIC SELECT ड्राइव्ह प्रोग्राम्स (“स्लीपरी”, “कम्फर्ट”, “स्पोर्ट”, “स्पोर्ट+”, “इनडिव्हिज्युअल” आणि “रेस”) यामुळे आरामदायक ते वेगवान यापर्यंत वाहनाची वैशिष्ट्ये बदलणे शक्य होते. समग्र AMG DYNAMICS यंत्रणा ही ESP® कार्ये वाढवते आणि ऑल-व्हील ड्राइव्ह व स्टिअरिंग कंट्रोलमध्ये अधिक सक्रिय हस्तक्षेप करते.

 

कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवा

Mercedes me connect services मध्ये व्यापक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये लाईव्ह वाहतूक विषयक माहिती, कार-टू-एक्स कम्युनिकेशन आणि Apple CarPlay व Android Auto द्वारे स्मार्टफोन इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. पर्यायी हेड-अप डिस्प्ले संबंधित माहिती 3D मध्ये दाखवतो, तर ambient lighting मध्ये 64 वेगवेगळे रंग पर्याय आहेत.

 

तांत्रिक तपशील सारांश: डिस्प्लेसमेंट

 

 

मर्सिडीज AMG GT 63 4MATIC+

मर्सिडीज -AMG GT 63 PRO 4MATIC+

डिस्प्लेसमेंट

3982 cc

3982 cc

रेटेड आऊटपुट

430/585 kW/hp

450/612 kW/hp

रेटेड टॉर्क

800 Nm

850 Nm

व्हीलबेस

2700 mm

2700 mm

L/H/W

4728/1354/1984 mm

4728/135

4/1984 mm

0-100 kmph

3.2 s

3.1 s (Cup 2R टायर्ससह)

कमाल वेग

315 किमी

317 किमी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments