Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील इच्छुक सहकारी संस्थांनी त्यानुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दि. २ जुलै ते १८ जुलै, २०२५ या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे (ग्रामीण) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रकाश ल. जगताप यांनी केले आहे.

 

सहकारी संस्थांनी अधिक माहितीसाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments