जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले ऐतिहासिक गोल रिंगण सोहळा लाखो वारकरी भक्त भाविकांचे दर्शन, डोळ्याचे पारणे फेडणारा गोल रिंगण सोहळा संपन्न
*”जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले ऐतिहासिक अश्व रिंगण सोहळा बेलवाडी तालुका इंदापूर येथे शनिवार दिनांक २८ रोजी उत्साहात पार पडले, सणसर येथील पालखी मुक्कामानंतर शनिवारी सकाळी सकाळी पालखी सोहळ्याने बेलवाडीच्या दिशेने प्रस्थान केले त्यानंतर बेलवाडीकरांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले, पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी ठिकठिकाणी स्वागत सत्कार स्वीकारत पालखी सोहळा बेलवाडी येथील ऐतिहासिक पालखी स्थळावर दाखल झाला बेलवाडी चे ग्रामस्थ तसेच बेलवाडी येथील भजनी मंडळाने पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले या भजनी मंडळात ह भ प प्रभाकर गुरव, बाळकृष्ण राऊत, रामदास नामदेव पवार, हभप भाग्यवंत, लक्ष्मण नामदेव पवार, ह भ प शिर्के, विठ्ठल शिर्के, आदी भजनी मंडळासह बेलवाडीतील ग्रामस्थ प्रथम नागरिक सौ मयुरी जामदार सरपंच, एडवोकेट शरद जामदार, ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन चे सदस्य मान्यवर दादासाहेब थोरात, अशोक थोरात, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी पोलीस पाटील अरविंद जाधव, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक विद्यार्थी अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, बेलवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रताप पवार, पुण्याच्या निवृत्त महीला मेजर सुनिता नेरळे, शेती उद्योजक मेंढपाळ अक्षय मारुतराव मचाले, बेलवाडी विकाचे सर्वे संजय विलास पवार , नाना गौतम पवार, सुधीर पवार, माजी सरपंच हनुमंत पवार, दत्तात्रय नामदेव पवार, साखर कारखान्याचे माजी कामगार तानाजी मुळीक, माजी सदस्य बापू जगन्नाथ पवार, रामभाऊ जामदार, अनिल तासवडकर, माजी सरपंच बापूराव दामोदर पवार, आबा साहेबराव पवार, सहकारी दूध संघाचे अध्यक्ष शहाजी शिंदे, नेचर डिलाईटचे अध्यक्ष अर्जुन देसाई, तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत जामदार संसरचे पांडुरंग शंकरराव निंबाळकर बेलवडीचे पोलीस पाटील गायकवाड, दिलीप निंबाळकर, अजित पांडुरंग पवार, डॉक्टर अंकुश घोलप, पत्रकार लक्ष्मण भिसे, प्रकाश खैरे, माजी सरपंच अनिल खैरे, प्रमोद करंजकर , राजेंद्र निकम, सागर जालिंदर पवार, माननीय तानाजीराव यादव साहेब, माननीय सर्जेराव जामदार, विनोद अंकुश पवार, माननीय भालचंद्र मुळीक, बापुराव पवार , विकास पवार, सतीश पवार बेलवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.*
*बेलवाडी येथील पहिल्या अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात बेलवाडीचे प्रगतशील बागातदार शेतकरी मेंढपाळ अक्षय मारोतराव मचाले यांच्या मानाच्या मेंढ्याच्या रिंगणाने झाली यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन धारी महिला , झेंडेकरी वारकरी ग्रामस्थांनी गोल रिंगण सोहळा पार पडला , यावेळी विठ्ठल भेटीच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांना वयोभान विसरून या रिंगण सोहळ्यात धावत रिंगण पूर्ण केले यावेळी सर्वांनी अलिखित आणि शिस्तबद्ध रिंगण सोहळ्याचे अभूतपूर्व असे दर्शन घडवले बेलवाडी पंचक्रोशीतील भाविकही लाखोच्या संख्येने उपस्थित होते.*
यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ह भ प भानुदास महाराज मोरे ह भ प तात्या महाराज मोरे ह भ प उमेश महाराज मोरे ह भ प शशिकांत महाराज मोरे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे गटविकास अधिकारी सचिन खुडे, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राजकुमार डुणगे, बेलवाडी च्या सरपंच मयुरी जामदार सहकार, दूध संघाचे चेअरमन शहाजी शिंदे, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक विद्यार्थी कामगार आघाडी अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, जया तुकाराम थोरात अशोक थोरात, अजित पांडुरंग पवार, सदस्य पंकज जामदार ग्रामविकास अधिकारी खर्चे महावितरणचे मोहन सूळ, संजय मुळीक, पत्रकार पोपटराव मुळीक आदीं यावेळी उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यानंतर बेलवाडी येथील ऐतिहासिक पालखी स्थळावरून पालखीचे बेलवाडी येथील हनुमान मंदिर येथे विश्रांतीसाठी पालखी सोहळा विसवला यानंतर बेलवाडी पवार मळा, शिर्के मळा, जामदार मळा, शिंदे वस्ती, बजरंग वाडी, बोरी, काजड, कर्दनवाडी, मोहितेवाडी, उंडे वस्ती, थोरातवाडी, उदमायवाडी, उद्धट, तावशी, कुरवली, चिखलीफाटा, वैदवाडी, चिखली लासुर्णे येथील ग्रामस्थांनी बेलवाडी येथील पालखी स्थळावर मारुती मंदिर येथे पालखी सोहळ्याचा दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी चार/५ नंतर पालखी सोहळा लासुर्णे, जंक्शन मार्गे निमगाव केतकी येथील मुक्कामी स्थळाकडे मार्गस्थ झाला, बेलवाडी लासुर्णे येथील लाखो ग्रामस्थांनी पालखी साहळ्याचे दर्शन घेत पालखी निमगाव केतकी येथील मुक्कामी स्थळाकडे भक्तिमार्गाचा आनंद घेत उत्साहात मार्गस्थ मध्ये सहभागी झाले होते


