पुणे, – २७ जून २०२५: भारतात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी मूळे होणारे अंधत्वाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पीबीएमएच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे येथे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (आरओपी) वर राष्ट्रीय सल्ला – विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कॉग्निझंट फाउंडेशन, मिशन फॉर व्हिजन आणि पीबीएमएच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यंच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साइट४ऑल या उपक्रमाच्या च्या अंतर्गत देशभरातील तज्ञ आणि भागधारक एकत्र आले होते .
या कार्यक्रमात इंडियन आर.ओ.पी सोसायटी, नॅशनल निओनॅटोलॉजी फोरम (एनएनएफ), इंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी), सरकारी अधिकारी, सीएसआर क्षेत्रातील नेतृत्व, ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्था आणि इंडियन आर.ओ.पी सोसायटीचे अध्यक्ष प्रो. डॉ. राजवर्धन आझाद यांच्यासह अनेक तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
भारतातील आरओपी प्रतिबंध आणि उपचार मजबूत करण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय-स्तरीय उपक्रमांसाठी हा कार्यक्रम उत्प्रेरक ठरेल. कार्यक्रमधील काही ठळक वैशिष्ट्ये-
· बाल आरोग्य धोरणांमध्ये समाविष्ट केलेल्या सुधारित राष्ट्रीय आरओपी मार्गदर्शक तत्त्वांवर एकमत.
· नवजात शिशु विभाग, नेत्र सेवा प्रदाते आणि सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्यातील बहुक्षेत्रीय सहकार्याला अधिक मजबूती.
· व्यापक भागधारक प्रतिनिधित्वासह राष्ट्रीय आरओपी टास्क फोर्सला बळकटी देण्याचा प्रस्ताव.
· पालक आणि काळजीवाहकांना माहिती देण्यासाठी जनजागृती मोहिमेला मान्यता.
· पायाभूत सुविधा आणि टेलिमेडिसिनसाठी सीएसआर आणि खाजगी क्षेत्राच्या समर्थनासाठी प्रयत्न.
· शिफारशींवर आधारित धोरण आणि जागृकतेसाठी तांत्रिक कार्यगटाची स्थापना.
रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी (आरओपी) ही मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे.जर याचे लवकर निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते.ही स्थिती 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या आणि 2000 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या नवजात शिशुंमध्ये दिसून येते.यावर जर उपचार घेतले नाहीत तर,डोळ्याचा पडदा (रेटिना) हा आजूबाजूच्या उतींपासून दूर जातो (रेटिनल डिटॅचमेंट). यामुळे दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो किंवा अंधत्व
येऊ शकते.


