Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपतर्फे (जीईजी) भारताच्या स्मार्ट, सस्टेनेबेल लॉजिस्टिक्स भविष्याला आकार गुड...

गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपतर्फे (जीईजी) भारताच्या स्मार्ट, सस्टेनेबेल लॉजिस्टिक्स भविष्याला आकार गुड अँड ग्रीन पोर्टफोलिओद्वारे मिळणाऱ्या ३७ टक्के उत्पन्नासह इको- अलाइन्ड पार्टनर्सच्या नेटवर्कमध्ये गेल्या ३ वर्षांत ३० टक्क्यांची वाढ

चेन्नई, २७ जून २०२५ – उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ग्लोबल हब बनण्याच्या दिशेने भारताचा प्रवास वेगाने सुरू आहे आणि गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुप (जीईजी) या क्रांतीच्या आघाडीवर आहे. इंट्रालॉजिस्टिक्स व्यवसायाच्या माध्यमातून मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचएफ) आणि स्टोअरेज सोल्यूशनद्वारे जीईजी ऑटोमेटेड लॉजिस्टिक्स यंत्रणा प्रभावी डिलिव्हरी देत आहे. या यंत्रणांसाठी आयओटी, ऑटोमेशन, एआय वापरण्यात येत असून आधुनिक वेयरहाउसेस आणि फॅक्टरीजना त्यांच्या कामकाजासाठी जास्त व्यापक संधी मिळत आहे.

 

इंट्रालॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने जीईजी उत्पादन प्रक्रिया व उत्पादने अधिक शाश्वत बनवण्यासाठी आर अँड डी तसेच इनोव्हेशमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. गेल्या तीन वर्षांत मटेरियल हँडलिंग आणि स्टोअरेज सोल्यूशन क्षेत्रात २०-२५ टक्क्यांच्या सरासरी हिश्श्यासह बाजारपेठेतील आघाडीची कंपनी या नात्याने कंपनी देशाचे हरित लॉजिस्टिक यंत्रणेच्या दिशेने नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीचे इंट्रालॉजिस्टिक्स व्यवसायासाठीचे अंदाजे ८५ टक्के देशांतर्गत खरेदी मूल्य स्थानिक पातळीवर मिळवले जाते. त्यावरून आत्मनिर्भर भारत व मूल्य साखळीत शाश्वततेसाठी असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

 

देशांतर्गत उत्पादन विकास, सुरक्षेतील नाविन्य, प्रीसिजन इंजिनियरिंग आणि शाश्वत तंत्रज्ञानात धोरणात्मक गुंतवणूक करत जीईजी वेयरहाउसेस व फॅक्टरी फ्लोअर्सचे आधुनिकीकरण करत आहेच, शिवाय वेगवान, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज लॉजिस्टिक्स यंत्रणा तयार करत आहे.

 

‘इंट्रालॉजिस्टिक्स क्षेत्रातील आमचे काम इंटर्नल ऑप्टिमायझेशनच्या पलीकडे जाणारे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात जास्त वेगवान व भविष्यासाठी सज्ज करणारे आहे,’ असे जीईजीच्या स्टोरेज सोल्यूशनचे व्यवसाय प्रमुख विकास चौधाहा म्हणाले. ‘आम्ही थ्रीपीएल्स, क्विक कॉमर्स कंपन्या आणि इतर मोठ्या उत्पादकांना ऑपरेटिंग खर्च कमी करण्यासाठी व डिलिव्हरीला चालना देण्यासाठी मदत करत आहोत. आज तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या डिलिव्हरीमध्ये गोदरेजचा हातभार लागलेला असतो.’

 

जीईजीच्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटचे व्यवसाय प्रमुख अनिल लिंगायत म्हणाले, ‘प्रभावी लॉजिस्टिक्स वेयरहाउसपासूनच सुरू होते. वाचणारा प्रत्येक क्षण पुरवठा साखळीसाठी लाभदायक ठरतो. आमच्या शाश्वत, डिजिटल-फर्स्ट सुविधांमध्ये इलेक्ट्रिक आणि लिथियम- आयन फोर्कलिफ्ट, टेलिमॅटिक्सि- एनेबल्ड, ऑटोमेटेड रॅकिंग प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. त्यांद्वारे लॉजिस्टिक्स यंत्रणांना कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरीव मदत केली जात आहे. एमएचई जुलैमध्ये फोर्कलिफ्ट्समध्ये आयओटी सुविधा लाँच करण्यासाठी तयारी करत आहे. जीईजीमध्ये आम्ही आमच्या उत्पादन आणि आर अँड डी क्षमतांचा विस्तार करत वेगवान, उच्च कामगिरी करणाऱ्या लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांची वाढती मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’

 

जीईजीचा इंट्रालॉजिस्टिक्स विभाग ई- कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स, क्विक कॉमर्स आणि रिटेल अशा वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांना शाश्वत, व्यापक आणि तंत्रज्ञानावर आधारित सुविधांद्वारे सक्षम करत आहे. नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसीसह सुसंगती साधत जीईजी आपल्या कामात हरित लॉजिस्टिक्स, वाजवी किंमत आणि डिजिटल इंटिग्रेशनला चालना देत आहे.

 

गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपची (जीईजी) शाश्वततेसाठी असलेली बांधिलकी चेन्नईतील स्टोअरेज सोल्यूशन सुविधेमधून दिसून आली आहे. त्यामुळे ३ पट वॉटर पॉझिटिव्हिटीसह हरित उत्पादन, सिग्नेटरी EP100 ला चालना मिळाली आहे, तर पाइप नैसर्गिक गॅसमुळे कार्बन उत्सर्जनात ३० टक्क्यांची घट दिसून आली आहे. या सुविधेद्वारे उर्जा आणि पाणी वापरावर देखरेख केली जात असून कचरा निर्मिती शून्यावर आणण्याचे ध्येय आहे. उत्पादनांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जीईजीचे इन्ट्रालॉजिस्टिक्स इनोव्हेशन्स देशभरातील वेयरहाउस कामकाजात क्रांती आणत असून त्यासाठी आरओएचएस- कम्प्लायंट स्टील व पावडरसारखा कच्चा माल वापरला जात आहे. शाश्वत पद्धतींमुळे उर्जा उत्पादनक्षमता दुहेरी झाली असून विशिष्ट उर्जेचा वापर ६० टक्क्यांनी कमी झाला आहे.

 

दरम्यान एमएचई विभागाद्वारे विक्रोळी (मुंबई) येथे सस्टेबिलिटीचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे उर्जेची उत्पादनक्षमता वाढली आहे, कार्बन निर्मिती कमी झाली आहे आणि अक्षय उर्जा व जल संवर्धन पद्धतींचा अवलंब वाढला आहे. दरम्यान इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी या नात्याने एमएचई विभागाने नुकतीच देशातील पहिली लिथियम- आयन बॅटरी पॉवर्ड फोर्कलिफ्ट उपलब्ध केली असून त्यात देशात विकसित करण्यात आलेली बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (बीएमएस) देण्यात आली आहे. या सिस्टीममुळे भारतातील आव्हानात्मक हवामानातही कामगिरी, सुरक्षा आणि बॅटरी लाइफ चांगले राहाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ८२ टक्के प्रमाण इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट ट्रक्सचे असून हा विभाग भारतासाठी हरित, जास्त कार्यक्षम भविष्याची निर्मिती करत स्मार्ट, सस्टेनेबल लॉजिस्टिकच्या दिशेने प्रवास करत आहे.

 

भारतातील लॉजिस्टिक्स खर्च सध्या जीडीपीच्या १४- १८ टक्के आहे आणि तो एकेरी आकड्यावर आणण्याचे राष्ट्रीय ध्येय आहे. भारत या ध्येयाच्या दिशेने जात असतानाच जीईजी आघाडीवर राहाण्यासाठी, वेगवान, बुद्धीमान व शाश्वत लॉजिस्टिक्स यंत्रणा उभारण्यासाठी बांधील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments