वी बिझनेसच्या रेडी फॉर नेक्स्ट डिजिटल मॅच्युरिटी असेसमेंट प्लॅटफॉर्मवर गेल्या ३ वर्षात २ लाखांहून जास्त एमएसएमई सहभागी झाले आहेत.
· ‘रेडी फॉर नेक्स्ट एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी २०२५’च्या तिसऱ्या आवृत्तीनुसार, भारताचा एमएसएमई डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स (डीएमआय) २०२३ मध्ये ५६.६ होता आणि २०२५ मध्ये ५८.० पर्यंत वाढला आहे.
· क्लाऊड आणि सुरक्षेला अधिक महत्त्व मिळत आहे, ७०% पेक्षा जास्त एमएसएमई डिजिटल गुंतवणूक वाढवण्याचे ठरवत आहेत.
· सर्वात जास्त डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स ७१.२ तेलंगणातील एमएसएमईचा आहे, त्यापाठोपाठ केरळ ६३ आणि महाराष्ट्रातील एमएसएमईंचा ५९ आहे.
· क्षेत्रांनुसार डिजिटल मॅच्युरिटी यादीमध्ये आर्थिक सेवा सर्वात वर आहेत, त्यांचा डीएमआय स्कोर ६६, त्यापाठोपाठ वाहतूक ६२ आणि रिटेल क्षेत्राचा डीएमआय देखील ६२ आहे.
आघाडीची टेलिकॉम कंपनी वी चा एंटरप्राइज विभाग, वी बिझनेसने जागतिक एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) दिनानिमित्त, ‘रेडी फॉर नेक्स्ट एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी २०२५’ या आपल्या महत्त्वाच्या अहवालाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे.
डिजिटल इंडिया, भारत नेट आणि मोबाईल ब्रॉडबँडचा वापर यामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसाय आपली संचालन क्षमता आणि बाजारपेठेतील विस्तार वाढवण्यासाठी नवनवीन डिजिटल साधने वापरत आहेत.
‘रेडी फॉर नेक्स्ट एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी २०२५’ हे सकारात्मक परिवर्तन, देशाच्या डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्समध्ये (डीएमआय) होत असलेली वाढ दर्शवत आहे. पण तरीही डिजिटल स्वीकार प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे होत आहे. भक्कम निर्धार, योग्य आर्थिक साहाय्य आणि योग्य सल्ला सेवांची उपलब्धता यांच्यासह भारतातील लघु व्यवसाय त्यांच्या डिजिटल प्रवासाला वेगवान बनवण्यासाठी सज्ज आहेत.
‘रेडी फॉर नेक्स्ट एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी २०२५’ च्या प्रकाशनाच्या निमित्ताने, वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री अरविंद नेवतिया म्हणाले, “भारतातील एमएसएमई डिजिटल जिज्ञासेपासून डिजिटल वचनबद्धतेकडे जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे परिवर्तन खूप उत्साहवर्धक आहे. क्लाऊड, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रमाणात होत असलेली वाढ दर्शवते की, लघु व्यवसाय हे तंत्रज्ञानाकडे फक्त एक सुविधा म्हणून नाही तर वृद्धी सक्षम करणारा घटक म्हणून पाहत आहेत. रेडी फॉर नेक्स्ट प्रोग्राममार्फत आम्ही भारतातील एमएसएमईच्या अतुलनीय वृद्धी वाटचालीचा सन्मान करू इच्छितो – छोट्या नगरांपासून ते जागतिक बाजारपेठांपर्यंत, मानवी हातांनी करावयाच्या प्रक्रियांपासून ते डिजिटल-फर्स्ट एंटरप्राइजपर्यंत हा संपूर्ण प्रवास लक्षणीय आहे.”
‘रेडी फॉर नेक्स्ट एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी २०२५’ मधील ठळक निष्कर्ष:
डिजिटल चार्जमध्ये दक्षिण भारत आघाडीवर – राष्टीय डीएमआय रँकिंगमध्ये तेलंगणा सर्वात वर
भारताचा राष्ट्रीय डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स २०२३ मध्ये ५६.६ होता, २०२४ मध्ये ५७.३ आणि २०२५ मध्ये ५८.० इतका वाढला. दक्षिण भारत या डिजिटल परिवर्तनामध्ये आघाडीवर आहे (डीएमआय ६२.९), त्यापाठोपाठ पश्चिम भारत (५७.४), पूर्व (५७.१) आणि उत्तर (५५.८) आहेत.
राज्यांची कामगिरी बघता, तेलंगणा सर्वात वर डीएमआय ७१.२ आहे. हैद्राबादचे सायबराबाद होण्यापर्यंतचा प्रवास, स्वदेशी ते जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत, सरकारच्या पाठिंब्याने उभारण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टिम यांनी एमएसएमईमध्ये डिजिटल स्वीकाराला लक्षणीय प्रोत्साहन दिले आहे. केरळचा डीएमआय ६३.७ आहे, उच्च डिजिटल साक्षरता आणि मजबूत सेवा क्षेत्र यामुळे हे शक्य झाले आहे.
महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा असून डीएमआय ५९.२ आहे, मुंबईतील आर्थिक सेवा बेस आणि पुण्यातील आयटी व औद्योगिक इकोसिस्टिमचे यात मोठे योगदान आहे.
डिजिटल गुंतवणूक वाढत आहे, क्लाऊड आणि सायबर सुरक्षेला अधिकाधिक महत्त्व दिले जात आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डिजिटल परिपक्वतेचे प्रमाण वेगवेगळे आहे, पण अभ्यासात असे आढळून आले आहे की, गुंतवणूक वाढवण्याच्या योजना सर्वच क्षेत्रांमध्ये आखल्या जात आहेत. डिजिटल परिवर्तन बजेट वाढवणाऱ्या क्षेत्रांच्या यादीत प्रोफेशनल सेवा यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यापाठोपाठ रिटेल, लॉजिस्टिक्स, वाहतूक, मीडिया आणि मनोरंजन, उत्पादन, टेलिकॉम, शेती, आर्थिक सेवा आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. वाढत्या सायबर धोक्यांना प्रतिसाद म्हणून ७२% एमएसएमई क्लाऊडवरील खर्चात वाढ करू इच्छितात, ७६% नी सायबर सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
डिजिटल नेतृत्व: लैंगिक समानता
महिला उद्योजिकांचा डीएमआय ५७.४ आणि पुरुष उद्योजकांचा डीएमआय ५७.७ आहे. अगदी थोड्या प्रमाणात का होईना, पण शिक्षण आणि आयटी या क्षेत्रांमध्ये क्लाऊड व सुरक्षेमध्ये महिला उद्योजिका आघाडीवर आहेत.
४० ते ६० वर्षे वयातील उद्योजक डीएमआयच्या बाबतीत ६४.० सह आघाडीवर आहेत, डिजिटल सॅव्ही असणे हे युवा व्यावसायिकांचे (डीएमआय ५७) वैशिष्ट्य उरलेले नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.
डिजिटल परिपक्वता वाढत आहे, पण फक्त १२% एमएसएमई पूर्णपणे डिजिटाइज्ड आहेत. डिजिटल स्वीकार अद्याप होणे बाकी आहे.
या अभ्यासातून दिसून आले आहे की, २०२५ मध्ये देशाचा डीएमआय ५८.० पर्यंत वाढला पण तरी फक्त १२% एमएसएमईनी संपूर्ण डिजिटल परिपक्वता गाठली आहे, डिजिटल स्वीकार होणे अद्याप बाकी असल्याचे यावरून दिसून येते.
सर्वच क्षेत्रांमधील व्यावसायिक डिजिटल साधने वापरू पाहत आहेत, पण तरीही ग्राहकांना जोडणारे तंत्रज्ञान आणि इंटर्नल कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म्स यासारख्या ठिकाणी महत्त्वाच्या कमतरता आहेत. यावरून दिसून येते की, उद्देश आहे पण प्रत्यक्षात अंमलबजावणीचा वेग कमी आहे, खासकरून सूक्ष्म आणि लघु व्यवसायांमध्ये, ज्याठिकाणी आर्थिक क्षमता आणि
सल्ला सेवांची उपलब्धता हे अडथळे


