एकेकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हृदयविकार सध्या तरुण लोकसंख्येवर वाढत्या प्रमाणात परिणाम करत आहे, धक्कादायक आकडेवारीनुसार 25% हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये होतात.
पारंपारिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून 50 पेक्षा जास्त मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी (MICS) केसेस यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत हे जाहीर करताना मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरीला अभिमान वाटतो. MICS प्रक्रिया कोरोनरी धमनी रोग, हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारावर उपचार करण्यासाठी करण्यात येते.
डॉ आशिष बाविस्कर, कार्डिओ-व्हस्क्युलर थोरॅसिक सर्जन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी म्हणाले, “एमआयसीएस हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच वापर दिसून येतो, रुग्णांना बरे होण्याची वेळ, उत्कृष्ट परिणाम तसेच कमीतकमी आक्रमकतेचा वापर केला जातो. आमच्या रूग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करून या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे, आम्हाला कळवताना अभिमान वाटतो की, आमच्या पुणे केंद्रात एकूण कार्डियाक शास्त्रक्रियांपैकी ६० ते ७० टक्के शस्त्रक्रिया एमआयसीएस पद्धतीने केल्या जातात. शिवाय, या क्रांतिकारी तंत्राचा वापर करून होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये दरवर्षी ३०% ज्यादा वाढ होताना दिसून येत आहे.”
पारंपारिक ओपन-हार्ट प्रक्रियेच्या विपरीत, एमआयसीएसमध्ये छातीच्या डाव्या बाजूला लहान चीरा देऊन शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामुळे रुग्णांना अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे एमआयसीएस प्रक्रियेमध्ये रक्ताचा नाश फार कमी होतो, संसर्गाचा धोका देखील कमी होतो आणि केवळ २ ते ३ सेमिचा चिरा असल्याने व्रण देखील उमटत नाही. शिवाय, MICS मधुमेह, दमा आणि धूम्रपान करणारे तसेच एका पेक्षा अधिक ब्लॉक असलेला रुग्णावर देखील केला जाऊ शकतो. तसेच हृदयाशी संबंधित विविध प्रक्रिया जसे की झडप दुरुस्ती आणि बदलणे, हृदयाची गाठ आणि जन्मजात हृदयाच्या स्थितीसाठी ही प्रक्रिया केली जाऊ शकते.
अनेक फायदे असलेल्या या शस्त्रक्रियेमुळे हृदय विकार असलेल्या रुग्णाचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे अतिशय सहजतेने केल्या जातात.
मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे ५० हून अधिक MICS प्रक्रिया यशस्वी
Share with
Tagged in :