Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी हिरोशी योशिझेन यांची नियुक्ती

ब्रिजस्टोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी हिरोशी योशिझेन यांची नियुक्ती

पुणे, 12 फेब्रुवारी, 2023 : टायर व शाश्वत वाहतूक उपाययोजनांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीच्या असलेल्या ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचा एक भाग असलेल्या ब्रिजस्टोन इंडियाने श्री. हिरोशी योशिझेन हे नवीन व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारतील, असे आज जाहीर केले. श्री. स्टेफानो सांचिनी यांच्या जागी योशिझेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांचिनी यापुढे युरोपाशी कन्झ्युमर रिप्लेसमेंटचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. योशिझेन या ब्रिजस्टोन जपानमध्ये अनेक नेतृत्व पदांची जबाबदारी सांभाळली आहे आणि आता ते या नव्या भूमिकेत रुजू होणार आहेत. या नव्या जबाबदारीआधी ते ब्रिजस्टोन टायर सोल्युशन्स जपान कं. लि.च्या बिझनेस, रिटेल आणि सर्व्हिस बिझनसेचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करत होते.
ब्रिजस्टोन पूर्व आणि पश्चिमच्या जागतिक पातळीवरील पुनर्रचनेसंदर्भातील ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनच्या अलीकडील घोषणेनंतर हा बदल करण्यात आला आहे. भारत पूर्व विभागांतर्गत नियुक्त केला जाईल. परिणामी, बीएसएपीआयसी हा विभाग एक एसबीयू – एशिया पॅसिफिक, भारत आणि चीन असा होईल. या भागातील ग्राहकांच्या संवेदना सारख्या आहेत आणि या बाजारपेठा पुढे विकसित करण्यासाठी ब्रिजस्टोनच्या सहयोगितेचा उपयोग करून घेता येईल.
“भारत ही ब्रिजस्टोनसाठी धोरणात्मक, बदलणारी आणि वृद्धी बाजारपेठ आहे. या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण संधी आणि आव्हाने आहेत. कारण या देशातील मोटारउद्योग, संख्या व तंत्रज्ञान या दोन्ही पैलूंचा विचार करता बराच वाढत जाणार आहे. आमच्या भागीदारांसोबत आणि ब्रिजस्टोनच्या टीमसोबत काम करण्यास आणि या माध्यमातून आमचे ग्राहक, वाहन उत्पादक आणि समुदायाला सेवा प्रदान करण्यास मी उत्सुक आहे.”, असे श्री. हिरोशी योशिझेन म्हणाले.
“भारतातील माझा कार्यकाळ समाधानकारक होता आणि खूप शिकायला मिळाले. कारण येथील वैविध्यता आणि भारतीय बाजारपेठेतील गुंतागुंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या माझ्या अनुभवाचा माझ्या पुढील वाटचालीस नक्कीच उपयोग होईल, याची मला खात्री आहे. ब्रिजस्टोन आणि बिझनेस पार्टनर्सनी दाखवलेली आपुलकी आणि सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. 2024 मधील प्रत्येक संधी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा मला विश्वास आहे.”, असे श्री. स्टेफानो सांचिनी म्हणाले.
श्री. स्टेफानो सांचिनी यांनी जानेवारी 2023 मध्ये व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात कंपनी नव्या उंचीवर पोहोचली आणि इंदूरच्या कारखान्यातील 100 दशलक्षाव्या टायरचे उत्पादन, पुण्यातील कारखाना कार्बन न्यूट्रल झाल्याचे सत्यापन असे महत्त्वाचे टप्पे साध्य केले.”
ब्रिजस्टोन आशिया पॅसिफीक पीटीई. लि.बद्दल
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन हे सुरक्षित व शाश्वत वाहतुकीसाठी उपाययोजना प्रदान करण्यासाठी टायर आणि रबर बिल्डिंगमध्ये जागतिक पातळीवरील आघाडीवर आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय टोकियोमध्ये असून या कंपनीमध्ये जगभरात सुमारे 130,000 कर्मचारी आहेत आणि जगातील 150 देश आणि भागांमध्ये ते व्यवसाय करतात.
ब्रिजस्टोन आशिया पॅसिफिक पीटीई. लि.चे सिंगापूरमधील विभागीय कार्यालय टायर निर्मिती आणि विक्री सुविधांचे कामकाज सांभाळते आणि आपले उत्पादन या भागातील 20 बाजारपेठांमध्ये पुरवते. ब्रिजस्टोन एशिया पॅसिफिक पीटीई. लि. आणि या प्रदेशातील उपकंपन्या ओरिजिनल उपकरणे व रिप्लेसमेंट टायर, टायरशी संबंधित उपाययोजना व वाहतूक उपाययोजनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो उपलब्ध करून देतात, ज्यातून सामाजिक मूल्ये आणि ग्राहक मूल्ये प्रदान करतात. ‘ब्रिजस्टोन ई8 कमिटमेंट’ या आपल्या कॉर्पोरेट निर्धाराशी सुसंगत राहत ब्रिजस्टोनचा वाहतुकीचे शाश्वत भविष्य घडविण्याचा आणि लोकांचा प्रवास, जीवनमान, काम आणि खेळ चांगले करण्याचा निर्धार आहे
ब्रिजस्टोन इंडियाबद्दल
ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि.चे कामकाज 1996 मध्ये सुरू झाले. मार्च 1998 मध्ये त्यांनी मध्यप्रदेशमधील खेडा येथे त्यांचा निर्मिती कारखाना सुरू केला. भारतातील रस्त्यांवर भारतात उत्पादित झालेले टायर भारतात वापरण्याचे ध्येय ब्रिजस्टोनने साध्य केले आहे. पुण्यातील चाकण येथे 2013 मध्ये अजून एक कारखाना सुरू करत त्यांनी विस्तारीकरण केले. 2023 मध्ये इंदूरच्या कारखान्यात त्यांनी आपल्या 100 दशलक्षाव्या टायरचे उत्पादन केले. 25 वर्षांच्या कमी कालावधीत ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही ओईएम आणि रिप्लेसमेंट बाजारपेठेतील एक आघाडीची टायर कंपनी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments