Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्राणीप्रेमी युवतीने वाचविला एका मांजरीचा जीव; रस्त्यावरील बालीला मिळाले हक्काचे घर ...

प्राणीप्रेमी युवतीने वाचविला एका मांजरीचा जीव; रस्त्यावरील बालीला मिळाले हक्काचे घर डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये मिळाले जीवनदान

पुणे: पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेल्या बाली नावाच्या मांजरीला उपचारासाठी पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. भारतातील आघाडीचे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून तब्बल सहा महिन्यांनंतर कोणत्याही वेदनेशिवाय ती पुन्हा चालू लागली आहे. वेळीच उपचार केल्याने आज बालीला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे.

 

उपचारापुर्वी बाली अतिशय खेळकर आणि उत्साही होती. जरी ती रस्त्यावर राहत असली तरी ती प्राणीप्रेमी राधिका दीक्षित यांच्या जीवनाचा एक भाग बनली होती. दररोज सकाळी, बाली तिचे डोळे मिचकावून राधिकाचे स्वागत करत असे तसेच आशेने खाऊ आणि काही क्षण खेळण्याची वाट पाहत असे. दिवसेंदिवस त्यांचे भावनिक बंध अधिक घट्ट होत गेले.

 

एकेदिवशी अशी एक हृदयद्रावक घटना घडली जेव्हा राधिकाला बाली रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळली. त्या क्षणी तिला पाहून राधिकाला मोठा धक्काच बसला. त्या दिवशी राधिका बालीला घरी घेऊन गेली, तिच्या आयुष्यासाठी लढण्याचा आणि तिला भरपुर प्रेम आणि सुरक्षितत वातावरण उपलब्ध करुन देण्याचा निश्चय केला.

 

२ सप्टेंबर २०२४ रोजी, राधिका बालीला नियमित तपासणीसाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेली. डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तिला लसीकरण करण्यात आले आणि तिचे डिवर्मींग करण्यात आले.

 

२६ जानेवारी २०२५ रोजी, बालीला आपत्कालीन स्थितीत क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले कारण तिने तिची चालण्याची क्षमता गमावली होती. एक्स-रेमध्ये पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले आणि तिच्या रक्त चाचण्यांमध्ये अनेक कमतरता दिसून आल्या. डॉ. परदेशी यांनी ताबडतोब तिला वेदना कमी करण्यासाठी आणि तिची प्रकृती सुधारण्यासाठी विटकोफोल इंजेक्शन आणि मेलोफ्लेक्स लिक्विडसह औषधे देण्यास सुरुवात केली.

 

तिच्या प्रकृतीचे निरीक्षण केल्यानंतर, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. डॉ. परदेशी यांनी बालीला शस्त्रक्रियेच्या जागेवर चाटणे किंवा चावणे टाळण्यासाठी ताबडतोब एलिझाबेथ कॉलर वापरण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, बालीने स्वतःच्याच डाव्या बाजूच्या मागच्या पायाला चावले, ज्यामुळे टिबिया आणि फायब्युला हाडे मोडली.

 

त्यानंतर पुढील काही महिने जखमेचू काळजी घेण्यात आली, जिथे टीमने बालीचा पाय आणि जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. तिने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. जून २०२५ मध्ये, तिच्या पाठीचा पूर्णतः बरा झाला असून आता बरी पुर्ववत आयुष्य जगु लागली आहे.

 

स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकमधील भारतातील आघाडीचे पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी सांगातत की, बालीचे हे प्रकरण आम्ही हाताळलेल्या सर्व प्रकरणांमध्ये भावनिकदृष्ट्या अधिक गंभीर होते. तिने सर्व काही सहन केले व जगण्याची कधीच गमावली नाही. ती बरी होणे हे संयम, प्रेम आणि वेळीच उपचारांचे महत्त्व दर्शवते. ती वेदनामुक्त जीवन जगेल याची खात्री करण्यासाठी आता अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर सारख्या पर्यायी उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

 

बालीवरील यशस्वी उपचारानंतर राधिका दीक्षित यांनी आनंद व्यक्त करत “मला अजूनही ती सापडल्याचा पहिला दिवस आठवतो. ती शांत, घाबरलेली आणि कोपऱ्यात लपून बसलेली होती. आज ती सोफ्यांवरून उड्या मारत आहे, खेळण्यांसोबत खेळतेय आणि आत्मविश्वासाने ती आमच्या घरावर राज्य करत आहे. मी डॉ. परदेशी आणि त्यांच्या टीमची कायम ऋणी राहिन अशी प्रतिक्रिया राधिकाने

व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments