Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेह आणि स्थुलता या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

मधुमेह आणि स्थुलता या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

 

पुणे,4 जुलै 2025 : पुण्यामध्ये नुकतीच डायबेटिस ॲन्ड ओबेसिटी मेटॅमॉर्फोसिस या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे आयोजित या परिषदेचे हे दुसरे वर्ष आहे.या परिषदेचे उद्घाटन एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर,बी.जे.मेडिकल कॉलेजच्या औषधशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ.डी.बी.कदम,सिकलसेल आजार व्यवस्थापन क्षेत्रात प्रवर्तक म्हणून ओळख असलेले डॉ.सुदाम काटे,मगरपट्टा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,संचालक डॉ.दिविज माने,समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे,डायबेटिस विभागाच्या प्रमुख डॉ.रीमा काशिवा,वरिष्ठ बेरियाट्रिक फिजिशियन डॉ.जॉर्जिया रेगास आणि प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.अशोक तहलियानी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या परिषदेत बेरियाट्रिक सर्जरी,आँकोलॉजी,कार्डिओलॉजी,पोडियाट्री, न्युरोलॉजी,नेफ्रोलॉजी,फिजिओथेरपी,डायटेटिक्स,इत्यादी क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. मधुमेह आणि स्थुलता व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्र,कल यावर त्यांनी माहिती दिली.या परिषदेत बालपणातील स्थुलता,त्यामुळे होणारी गुंतागुंत,ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप ॲप्निआ,स्थुलता व्यवस्थापनामध्ये आहारातील दृष्टीकोन,अनुवंशिकतेचा परिणाम,मेटाबोलिक सिंड्रोम आणि तरूण पिढीमध्ये होणारे कर्करोग याविषयी अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली.

 

प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.पी.सी.मनोरिया,न्युरोलॉजिस्ट डॉ.नस्ली इच्छापोरिया आणि सुदाम काटे रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ.सुदाम काटे यांना त्यांच्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments