Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेकॉर्ड अलर्ट: स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला ...

रेकॉर्ड अलर्ट: स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला जानेवारी ते जून २०२५ दरम्‍यान 36,194 युनिट्सची विक्री · विक्रमी आकडेवारीमध्‍ये २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीच्‍या तुलनेत 134 टक्‍क्‍यांची वाढ झाली. · स्‍कोडा ऑटो इंडिया भारतातील

मुंबई, 4 जुलै, २०२५ – स्‍कोडा ऑटो इंडिया प्रगतीच्‍या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे, जेथे भारतात २५वा वर्धापन दिन आणि जागतिक स्‍तरावर १३०वे वर्ष साजरा करत आहे. २०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये 36,194 हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीसह स्‍कोडा ऑटोने भारतातील आपल्‍या २५ वर्षांच्‍या इतिहासामध्‍ये सर्वोच्‍च सहामाही विक्री संपादित केली आहे.

 

 

 

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”आमच्‍या महत्त्वपूर्ण सहामाही विक्रीमधून भारतातील ग्राहकांनी स्‍कोडा उत्‍पादने व सर्विसेसचा केलेला अवलंब दिसून येतो. आमच्‍या ग्राहकांना दररोज विश्‍वातील सर्वोत्तम स्‍थळांना एक्‍स्‍प्‍लोअर करायला आवडते. आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये कायलॅकची भर करण्‍यासह आम्‍ही आता ‘एसयूव्‍ही फॉर एव्‍हरीवन’च्‍या माध्‍यमातून, तसेच आमच्‍या सेदान ऑफरिंगच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा प्रवास अधिक सुखकर व उत्‍साहवर्धक करत आहोत. आमचा सहज उपलब्ध उत्‍पादने, सर्विसेस आणि देशभरातील टचपॉइण्‍ट्ससह भारतातील ग्राहकांच्‍या अधिक जवळ पोहोचण्‍याचा मनसुबा आहे. हे यश आम्‍हाला वेळेवर उत्‍पादन सादर करत, आमच्‍या उत्‍पादन व सर्विस ऑफरिंग्‍जमध्‍ये विविधता आणण्‍याद्वारे ग्राहकांना अद्वितीय मूल्‍य देत आणि अद्वितीय मालकीहक्‍क अनुभवासह ग्राहकांमध्‍ये प्रबळ विश्‍वास निर्माण करत त्यांच्याशी जुडण्‍यावर लक्ष केंद्रित करत राहण्‍यास प्रेरित करते.”

 

 

 

विक्री विक्रम स्‍थापित करत आहे

 

२०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत 36,194 हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीसह स्‍कोडा ऑटो इंडिया आता भारतातील टॉप सात ऑटोमोटिव्‍ह ब्रँड्समध्‍ये सामील झाली आहे. २०२४ मधील रँकिंग्‍जच्‍या तुलनेत कंपनीने चार पोझिशन्‍स वर झेप घेतली आहे. तसेच, स्‍कोडा ऑटो इंडियाने २०२२ मधील २८,८९९ युनिट्सच्‍या सर्वोत्तम सहामाही विक्रीला मागे टाकले आहे.

 

 

 

एसयूव्‍ही फॉर एव्‍हरीवन आणि सेदान वारसा अधिक दृढ

 

स्‍कोडा ऑटो इंडियाने कायलॅकच्‍या लॉंचसह २०२५ ची उत्‍साहात सुरूवात केली. ही ग्राहकांसाठी पहिली सब-४ मीटर एसयूव्‍ही आणि स्‍कोडा फॅमिलीमधील नवीन वेईकल आहे, जी ब्रँडला प्रथम श्रेणीच्‍या बाजारेपठांमध्‍ये अधिक विस्‍तार करण्‍यास आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्‍यास मदत करत आहे. यानंतर नवीन, सेकंड जनरेशन कोडियक लक्‍झरी ४x४ लॉंच करण्‍यात आली. कुशकसह स्‍कोडा ऑटो इंडिया आता देशभरातील ग्राहकांच्‍या विविध गतीशीलता गरजांना अनुसरून एसयूव्‍हीची व्‍यापक श्रेणी देते. स्‍कोडा ऑटो इंडिया स्‍लाव्हिया सेदान आणि भारतात लवकर लॉंच करण्‍यात येणाऱ्या जागतिक आयकॉनसह आपला सेदान वारसा अधिक दृढ करत आहे. स्‍कोडा ऑटो इंडिया आपल्‍या संपूर्ण पोर्टफोलिओमध्‍ये ऑटोमॅटिक्‍स व डायरेक्‍ट इंजेक्‍शन टर्बोचार्ज इंजिन्‍सची सर्वात प्रगत श्रेणी देखील देते, ज्‍यामधून ग्राहकांना सोईस्‍कर, आरामदायी, सुरक्षित आणि उत्‍साहवर्धक गतीशीलता अनुभव मिळतो.

 

 

 

ग्राहकांसाठी अधिक सोयीसुविधा

 

२०२१ मध्‍ये १२० टचपॉइण्‍ट्स वरून स्‍कोडा ऑटो इंडियाने आपले नेटवर्क आजच्‍या तारखेपर्यंत २९५ हून अधिक टचपॉइण्‍ट्सपर्यत विस्‍तारित केले आहे. कंपनी २०२५ च्‍या अखेरपर्यंत ३५० टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा गाठण्‍याच्‍या आपल्‍या ध्‍येयाप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यासाठी भारतभरात विनासायास ग्राहक अनुभव देण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.

 

 

 

स्‍कोडा ऑटो इंडिया आपल्‍या सर्व उत्‍पादनांवर दर्जात्‍मक स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटी, तसेच विस्‍तारित वॉरंटी आणि ग्राहकांना मेन्‍टेनन्‍स पॅकेजेसची व्‍यापक श्रेणी देउ केले आहे. याव्‍यतिरिक्‍त, स्‍कोडा सुपरकेअर मेन्‍टेनन्‍स पॅकेज आता एक वर्षासाठी प्रत्‍येक स्‍कोडा कारसह कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी आहे. यासह स्‍कोडा वेईकलच्‍या मालकाला रूटिन सर्विससाठी मालकीहक्‍काच्‍या दुसऱ्या वर्षाच्‍या शेवटी किंवा ३०,००० किमीनंतर (जे अगोदर असेल ते) पहिला खर्च होईल.

 

 

 

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments