Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedखरीप व रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर

खरीप व रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर

 

 

 

पुणे, दि. 8 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन 2025-26 साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मूग व उडीद पिकासाठी स्पर्धेत 31 जुलै पर्यंत तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सहभाग घेता येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप 11 व रब्बी हंगामातील 5 अशा एकूण 16 पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश असून त्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत सहभाग घेता येईल.

 

पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुकापातळीवर 5 हजार, 3 हजार व 2 हजार, जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार व 5 हजार तर राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पीकस्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments