Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकला ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकली पाहिजे* ज्येष्ठ गायक व संगीतकार दयानंद...

कला ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकली पाहिजे* ज्येष्ठ गायक व संगीतकार दयानंद घोटकर यांचे मत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गा’चे उद्घाटन

 

 

पुणे : संगीत क्षेत्रात सध्या अनेक बदल घडत आहेत. अनेकजण ट्रॅकवर गाणी गाऊन स्वतःला उत्तम गायक समजतात. मात्र, कला ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकली गेली पाहिजे, तेव्हाच ती पुढील पिढीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकते. पोवाडा गाणाऱ्याला सूर, ताल यांच्याबरोबरच वीररसाचीही समज असणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ गायक व संगीतकार दयानंद घोटकर यांनी व्यक्त केले.

 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने ‘निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील ‘कलाग्राम’मध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. डॉ. आनंद काटीकर, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रा. डॉ. आनंद काटीकर म्हणाले, आपल्या राजांचा पराक्रम सांगण्यासाठी शाहीर निर्माण झाले. असा राजा असेल तर अनेक चांगले शाहीर घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी असा एकही राजा नव्हता, ज्याचे कौतुक करण्याजोगे होते. पोवाडा म्हणजे वीररसयुक्त काव्य असून, ते तुम्ही शिकणार आहात. तुमच्या गायनातून लोकांच्या मनातील वीररस जागृत व्हावा,असेही त्यांनी सांगितले.

 

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, कलेचे संस्कार पुढच्या पिढीला द्यावेत, यासाठी गेली अठ्ठावीस वर्षे मी विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे पुढील पिढीला आपली संस्कृती समजेल आणि कलेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलेल. कलेच्या प्रत्येक संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपली कला उत्कृष्टरीत्या सादर करावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षदा इनामदार हिने तर आभार प्रदर्शन कु. जान्हवी शिंदे हिने केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments