पुणे, दि. 9 : सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे तसेच मंगलमुखी किन्नर चारिटेबल ट्रस्ट व रेनबो रुटस फाऊंडेशन (सी.वाय.डी.ए.) संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे तृतीयपंथी, पारलिंगी व्यक्तींना ओळखपत्र प्रमाणपत्र नोंदणीबाबतच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष शिबिरामध्ये 31 तृतीयपंथी व्यक्तींची पारलिंगी ओळखपत्र प्रमाणपत्र नोंदणी करण्यात आली, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000


