Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन आर अँड डी जीसीसी तसेच इनक्युबेशन सेंटरसह टीपी-लिंक इंडियाने भारताप्रती असलेली...

नवीन आर अँड डी जीसीसी तसेच इनक्युबेशन सेंटरसह टीपी-लिंक इंडियाने भारताप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित केली – बेंगळुरू आर अँड डी जीसीसी संशोधनावर लक्ष केंद्रित करेल तर मुंबई इन्क्युबेशन सेंटर विद्यार्थी आणि नवोन्मेषकांना अत्याधुनिक सुविधांची सोय देईल – पुढील वर्षी भारतातील कर्मचारी संख्या 30% ने वाढवण्याची आणि 20 नवीन सेवा केंद्रे उघडण्याची घोषणा कंपनीने केली आहे

मुंबई, 10 जुलै, 2025: जागतिक स्तरावर आणि वाय-फाय उपकरणांमधील देशातील बाजारपेठेतील आघाडीची कंपनी, कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स प्रोव्हायडर टीपी-लिंक इंडियाने आज देशातील आपल्या महत्त्वपूर्ण विस्ताराची घोषणा केली. टीपी-लिंकने भारतातील त्यांच्या पहिल्या इनक्यूबेशन सेंटरचे आज अनावरण केले, जे मुंबईतील त्यांच्या नवीन मुख्यालयाच्या जवळच आहे. नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी, भागीदारांना देण्यात येणारे प्रशिक्षण सुलभ करण्यासाठी आणि एंटरप्राइझ सोल्यूशन्सचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे केंद्र डिझाइन केलेले आहे. महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारत-प्रथम दृष्टिकोन आणखी मजबूत करून, टीपी-लिंक बेंगळुरूमध्ये संशोधन आणि विकासासाठी एक अत्याधुनिक ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) देखील येत्या काही आठवड्यात सुरू करणार आहे.

 

 

भारत केंद्रित विकास योजनेचा एक भाग म्हणून, पुढील वर्षभरात आणखी 20 सेवा केंद्रे स्थापन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून विशेषतः टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमध्ये आपले सेवा केंद्र नेटवर्क वाढवेल. या विस्तारामुळे देशभरातील विक्री-पश्चात पायाभूत सुविधांच्या बाबतीत टीपी-लिंक इंडिया सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवेल.

 

 

याव्यतिरिक्त, वाढत्या ऑपरेशन्स आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी टीपी-लिंक इंडिया पुढील वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 30% ने वाढवण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या इनोव्हेशन स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे बेंगळुरूमधील आगामी आर अँड डी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी), जे भारत आणि जागतिक बाजारपेठांसाठी नवनवीन उत्पादनांना चालना देईल. जीसीसी टीपी-लिंकच्या पोर्टफोलिओमध्ये फर्मवेअर डेव्हलपमेंट, एआय/एमएल ऍप्लिकेशन्स आणि प्रगत नेटवर्किंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करेल, यात त्यांचा एंटरप्राइझ सोल्यूशन्स ब्रँड, ओमाडाचाही समावेश आहे.

 

 

तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढच्या पिढीतील कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानामध्ये नवोपक्रमांना चालना देणे हा या नवीन इनक्युबेशन सेंटरचा उद्देश आहे. हे सेंटर भारतातील विद्यार्थी, विकासक आणि तंत्रज्ञानप्रेमींचे स्वागत करेल. तसेच त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी साधने, कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्कची देखील सोय करेल.

 

 

“मुंबईतील नवीन मुख्यालयात विद्यार्थ्यांसाठी इनक्यूबेशन सेंटर लाँच करून टीपी-लिंक इंडिया संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे हे पाहून खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांना या इनक्यूबेशन सेंटरचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने डिजिटल भारत निर्माण करण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे,” असे महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले.

 

 

“भावी पिढीला सक्षम बनवणे ही शाश्वत विकास आणि सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, यावर आमचा विश्वास आहे. या केंद्रात गुंतवणूक करून, आम्ही सर्जनशीलता, सहकार्य आणि धाडसी विचारपूर्वक चालणाऱ्या भविष्यात गुंतवणूक करत आहोत. स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, उद्योग भागीदार आणि व्यापक समुदायाला नवोपक्रमाच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. एकत्रितपणे, आम्ही अधिक गतिमान आणि समावेशक उद्योजकीय परिसंस्था घडवू शकतो,” असे टीपी-लिंक इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक संजय सहगल म्हणाले.

 

 

ते पुढे म्हणाले, “आमचे हे नवीन केंद्र ही केवळ एक जागा नाही तर ते नवनवीन, अनोख्या कल्पनांचे लाँचपॅड आहे. अत्याधुनिक साधने, मार्गदर्शन, पाठबळ आणि धोरणात्मक नेटवर्क्सची उपलब्धता या सुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र विविध प्रदेशांमधील इच्छुक उद्योजक, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि धोरणी लोकांसाठी एक केंद्र म्हणून काम करेल.

 

 

मुंबईतील हे नवीन केंद्र 20,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले असून, येथे सध्या 150 पेक्षा जास्त आसन क्षमता आहे. देशातील 10 शहरांमध्ये टीपी-लिंक इंडियाची कार्यालये आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments