पुणे,10 जुलै 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (एफडीसीआय) च्या सहकार्याने ह्युंदाई इंडिया कुटुर वीक 2025 च्या (एचआयसीडब्ल्यू) 18 व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या प्रमुख फॅशन कार्यक्रमासाठी एचएमआयएलचे एफडीसीआयसोबतच्या भागीदारीचे हे सलग तिसरे वर्ष असून यामध्ये भारतीय कारागिरी,कलाकुसर आणि देशाच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा केला जातो.
ह्युंदाई इंडिया कुटुर वीक या कार्यक्रमात रोहित बाल,जेजे वलया,मनिष मल्होत्रा,रितू कुमार,तरूण ताहिलियानी,अमित अग्रवाल,फाल्गुनी शेन पीकॉक,राहुल मिश्रा,शांतनू आणि निखिल,सुनीत वर्मा,रिमझिम दादू,जयंती रेड्डी,ईशा जाजोदिया यांचे रोझ रूम आणि आयशा राव इत्यादींचा समावेश आहे. हा उपक्रम 23 ते 30 जुलै 2025 दरम्यान नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित केला जाणार आहे.


