अलाइड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड (Allied Engineering) ही कंपनी भारतभर स्मार्ट मीटरिंग पायाभूत सुविधा उभारणाऱ्या युटिलिटी कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तसेच वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना पुरवते. या कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय शेअर बाजार नियंत्रक – सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्याकडे दाखल केला आहे.
कंपनीने आपल्या प्राथमिक समभाग विक्री (IPO) द्वारे भांडवली उभारणीची योजना आखली आहे. या सार्वजनिक समभाग विक्रीत (Public Offer) नवीन समभागांची विक्री (Fresh Issue) एकूण ₹400 कोटी (₹4,000 दशलक्ष) इतकी असेल, याशिवाय कंपनीकडून ₹5 दर्शनी मूल्य असलेल्या 75,00,000 समभागांची ‘ऑफर फॉर सेल’ (Offer for Sale) देखील करण्यात येणार आहे.
अलाइड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड ही कंपनी उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने भारतातील आघाडीच्या पाच ऊर्जा मीटर सोल्युशन्स पुरवठादारांमध्ये समाविष्ट आहे. 31 मार्च 2025 अखेर कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 7.29 दशलक्ष ऊर्जा मीटर इतकी आहे. (स्रोत: क्रिसिल अहवाल)
ही कंपनी महसूल वाढीच्या दृष्टीने भारतातील सर्वात वेगाने वाढणारी स्मार्ट ऊर्जा मीटर सोल्युशन्स पुरवठादार आहे. आर्थिक वर्ष 2023 ते आर्थिक वर्ष 2025 या कालावधीत कंपनीने 109.76% वार्षिक मिश्र वाढ दर (CAGR) साध्य केली आहे. (स्रोत: क्रिसिल अहवाल)
कंपनी स्मार्ट ऊर्जा मीटर आणि त्यास पूरक तंत्रज्ञानाचे उत्पादन व पुरवठा करते. यात कम्युनिकेशन नेटवर्क्स, डेटा मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म्स यांचा समावेश आहे, जे ऊर्जेच्या वापराचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, व्हिज्युअलायझेशन आणि ऑप्टिमायझेशन सुलभ करतात.
कंपनीच्या स्मार्ट ऊर्जा मीटर श्रेणीत ग्राहकांसाठीचे स्मार्ट मीटर (सिंगल फेज, थ्री फेज, लो व्होल्टेज करंट ट्रान्सफॉर्मर – LTCT, हाय व्होल्टेज करंट ट्रान्सफॉर्मर – HTCT), तसेच डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर (DT) स्मार्ट मीटर, फीडर आणि बाउंडरी स्मार्ट मीटर यांचा समावेश आहे.
कंपनीची व्यवसाय धोरणे केवळ युटिलिटी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, एएमआयएसपी (Advanced Metering Infrastructure Service Providers) आणि युटिलिटीज दोघांसोबत काम करण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर थ्री-फेज किंवा DT मीटर पुरवठा करू शकते. याशिवाय, अलाइड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड स्टॅटिक ऊर्जा मीटर (सिंगल आणि थ्री फेज), तसेच वायर आणि केबल्सचेही उत्पादन व पुरवठा करते.
या इश्यूसाठी ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.


