Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुळशीबाग गणपतीचा पुढाकार आदर्श उच्च व तंत्र शिक्षण...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुळशीबाग गणपतीचा पुढाकार आदर्श उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात

पुणे : गणेशोत्सव कार्यकर्त्यांवर होणारी टीका चुकीची असून, त्यांच्या विधायक आणि रचनात्मक कार्यामागे समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसण्यासाठी श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने इतरांसमोर आदर्श ठेवला असून, अशा उपक्रमांना शासनाची साथ कायम राहील.

 

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, पुण्यजागर प्रकल्पाच्या समन्वयक गीतांजली देगावकर, पल्लवी वाघ, दिनेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नितीन पंडित म्हणाले, आपल्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येते ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी महागणपतीचा आशीर्वाद सदैव राहील. आयोजनात मंडळाचे विश्वस्त साईनाथ डोंगरे, चकोर सुबंध, प्रतीक इप्ते, गणेश रामलिंग, अभिजीत वाळके, सौरभ कदम यांनी पुढाकार घे

तला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments