मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने व्यावसायिक वाहन ग्राहकांना सोईस्कर आर्थिक सोल्यूशन्स देण्यासाठी भारतातील झपाटयाने विकसित होत असलेली खाजगी क्षेत्र बँक बंधन बँकेसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सहयोगांतर्गत बंधन बँक संपूर्ण व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओमध्ये फायनान्सिंग सेवा देईल आणि ग्राहकांना बँकेचे व्यापक नेटवर्क, तसेच विशेषरित्या डिझाइन केलेल्या सुलभ परतावा प्लान्समधून फायदे मिळतील.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”आम्हाला या सामंजस्य कराराच्या माध्यमातून बंधन बँकेसोबतच्या आमच्या सहयोगाची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग ग्राहकांना एकसंधी आर्थिक सोल्यूशन्स देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधील प्रमुख टप्पा आहे. या सहयोगामधून सुलभ व कार्यक्षम आर्थिक सोल्यूशन्स देण्याप्रती, ग्राहकांना त्यांची व्यावसायिक ध्येये सहजपणे संपादित करण्यास सक्षम करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने, आम्ही आमच्या बहुमूल्य व्यावसायिक वाहन ग्राहकांना उत्तम सोयीसुविधा व पाठिंबा देण्यास उत्सुक आहोत.”
या घोषणेबाबत मत व्यक्त करत बंधन बँकेच्या ग्राहक कर्ज व तारण विभागाचे प्रमुख श्री. संतोष नायर म्हणाले, ”बंधन बँकेला विनासायास वाहन आर्थिक सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून व्यावसायिक वाहन ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजांची पूर्तता करण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते. आम्हाला विश्वास आहे की, हा सहयोग आम्हाला आमची पोहोच वाढवण्यास आणि व्यावसायिक वाहन विभागातील व्यवसायाच्या विकासाला साह्य करण्यासाठी सर्वोत्तम आर्थिक पर्याय प्रदान करण्यास सक्षम करेल.”
टाटा मोटर्स सब १-टन ते ५५ टन कार्गो वाहनांची आणि १०-सीटर ते ५१-सीटर मास मोबिलिटी सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी देते, ज्यामध्ये लॉजिस्टिक्स आणि मास मोबिलिटी विभागांच्या विकसित होत असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लहान व्यावसायिक वाहने व पिकअप्स, ट्रक्स आणि बसेस विभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्या २५०० हून अधिक टचपॉइण्ट्सच्या व्यापक नेटवर्कच्या माध्यमातून अद्वितीय दर्जा आणि सेवा कटिबद्धतेची खात्री देते. या नेटवर्कचे कार्यसंचालन प्रशिक्षित स्पेशालिस्ट्सकडून पाहिले जाते आणि टाटा जेन्यूएन पार्ट्सचे पाठबळ आहे.